
'महाराष्ट्र भूषण' गायिका आशा भोसले यांच्या फोटो बायोग्राफी पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. सह्याद्री अतिथी गृहावर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी आशाताईंच्या टिपलेल्या छायाचित्रांचं 'व्हॅल्युएबल ग्रुप' आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या पुढाकाराने 'बेस्ट ऑफ आशा' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे.

आशा भोसले यांच्या विविध भावमुद्रा आणि वेगवेगळ्या छायाचित्रातून त्यांचं जीवन आणि गाणं या पुस्तकातून उलगडण्यात आलं आहे.

सुमारे 42 विविध छायाचित्रे आणि त्या क्षणांच्या काही आठवणी यांची अत्यंत देखण्या स्वरूपात मांडणी असलेला हा एक मौल्यवान दस्तऐवजच ठरावं अशी पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांच्या हस्ते आणि आशा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथी ग्रहावर आज सकाळी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले.