
हरित वाहतुकीला चालना देणासाठी पुदुच्चेरी रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (PRTC) ने ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडकडून निर्मित 25 इलेक्ट्रिक बसेस सार्वजनिक सेवेत दाखल केल्या.

या बसेसचा लोकार्पण सोहळा मा. उपराज्यपाल श्री. के. कैलासनाथन, मा. मुख्यमंत्री श्री. एन. रंगासामी आणि मा. सभापती श्री. आर. सेल्वम यांच्या उपस्थितीत पार पडला.

स्मार्ट सिटी मिशनचा भाग असलेल्या या ताफ्यात १५ नॉन-एसी आणि १० एसी बसेस आहेत, या बस 9 मीटर लांब असून एका चार्जवर २०० किमी पर्यंत प्रवास करू शकतात.

या बसची खासियत म्हणजे शून्य उत्सर्ज, आवाजरहित आणि आरामदायक प्रवास.

या बसेसचे संचालन आणि देखभाल ईव्ही ट्रान्स प्रा. लि. (MEIL समूह) करणार असून १२ वर्षांच्या ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) अंतर्गत या सेवेचे परिचालन होईल.