
पुणे शहरातील नागरिकांना मेट्रोसाठी आता जास्त प्रतिक्षा करावी लागणार आहे. पुण्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय अशी मेट्रो सुरू झाली आहे. तसेच गरवारे ते रुबी हॉल या मार्गपर्यंत टेक्निकल ट्रायल पूर्ण झाली आहे.

फुगेवाडी-शिवाजीनगर न्यायालय मार्गाचे अंतर ८ किलोमीटर आहे. या मार्गावर बोपोडी, दापोडी, शिवाजीनगर, शिवाजीनगर न्यायालय अशी स्थानके आहे.

गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल रुग्णालय हे अंतर ७ किलोमीटर आहे. या मार्गावर डेक्कन, संभाजी उद्यान, महापालिका भवन, मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्टेशन आणि रूबी हॉल रुग्णालय हे स्थानके आहेत.

छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानकावर साकारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक 'मावळा पगडी'चे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

वनाज, आनंदनगर, नळस्टॉप, गरवारे कॉलेज या मेट्रो स्थानकांवर काम झाले आहे. या मार्गाचे तज्ज्ञांची समिती नेमून संपूर्ण मेट्रो मार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी झाली आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे.