
पुणे येथील तळेगाव रेल्वे स्थानकाचा विकास अमृत भारत योजनेत केला जात आहे. पुणे येथील तळेगाव रेल्वे स्टेशनचा विकासासाठी 38.54 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आला आहे. त्याचे काम वेगाने सुरु झाले आहे.

तळेगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर शेड तयार केले जात आहे. नवीन शौचालयाची उभारणी केली जात आहे. या ठिकाणी तीन लिफ्ट तयार करण्यात येणार आहे. तसेच दोन एक्सलेटर केले जाणार आहे. वेटींग रुम अधिक चांगले केले जाणार आहे.

अमृत भारत योजनेत येणाऱ्या रेल्वे स्टेशनमध्ये 76 रेल्वे स्थानके मध्य रेल्वेच्या अंतर्गत येतात. त्यात पुणे मध्य रेल्वे अंतर्गत सोळा रेल्वे स्थानके आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात आकुर्डी, तळेगाव आणि कोल्हापूर रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

अमृत भारत योजनेत समावेश असणाऱ्या रेल्वे स्थानकांवर विविध विकास कामे सुरु केली गेली आहे. त्यात नवीन रेल्वे स्थानकाची नवीन इमारत उभारणे, चांगले फ्लॅटफॉर्म तयार करणे, ओव्हरब्रिज करणे, लिफ्ट बसवणे आधी कामांचा समावेश आहे.

पुणे येथील तळेगाव आणि आकुर्डी रेल्वे स्थानकावर विकास कामे वेगाने सुरु झाली आहेत. त्याचे फोटो मध्य रेल्वेकडून शुक्रवारी जारी करण्यात आले आहे. तसेच हे रेल्वे स्थानक कसे असणार? यासंदर्भातही फोटो जारी केले गेले आहे.