AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आत्ताच खरेदी करा ‘या’ लोकप्रिय कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर, 1 जानेवारीपासून होणार महाग

1 जानेवारी 2026 पासून या इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्सच्या किमती वाढतील. तर दुसरीकडे सध्या कंपनी "इलेक्ट्रिक डिसेंबर" नावाची ऑफर सुरू केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 20 हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या कंपनीच्या स्कूटर महाग होणार आहेत.

आत्ताच खरेदी करा 'या' लोकप्रिय कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर, 1 जानेवारीपासून होणार महाग
1 जानेवारीपासून या लोकप्रिय कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर होणार महागImage Credit source: Ather
| Edited By: | Updated on: Dec 24, 2025 | 8:54 PM
Share

इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी एथर एनर्जी नवीन वर्षापासून त्यांच्या ई-स्कूटरच्या किमती वाढवणार आहे. सोमवारी कंपनीने घोषणा केली की ते 1 जानेवारी 2026 पासून त्यांच्या सर्व स्कूटर मॉडेल्सच्या किमती 3 हजार रुपयांपर्यंत वाढवणार आहे. जर तुम्ही एथर स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर डिसेंबर महिना तुमच्यासाठी बचत करण्याची शेवटची संधी ठरू शकते. कारण कंपनीने किंमत बदलण्यापूर्वी ग्राहकांसाठी ‘इलेक्ट्रिक डिसेंबर’ अशी ऑफर सुरू केली आहे. याअंतर्गत निवडक शहरांमध्ये स्कूटर खरेदीवर ग्राहकांना 20 हजार रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत, ज्यामध्ये एक्सचेंज बोनस, रोख सवलत किंवा अॅक्सेसरीजचा समावेश असू शकतो.

एथर एनर्जीच्या मते, जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक स्तरावर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ, परकीय चलनातील चढउतार आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक घटकांच्या किमतीत वाढ यामुळे इनपुट खर्च वाढला आहे, असे कंपनीने स्पष्ट केले. हा दबाव कमी करण्यासाठी किमतीत थोडीशी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या, एथर एनर्जीकडे स्कूटरच्या दोन मुख्य सिरीज आहेत, ज्या वेगवेगळ्या सेगमेंटच्या गरजा पूर्ण करतात.

एथरचे प्रमुख मॉडेल्स

  • एथर स्कूटर त्यांच्या टेक्नॉलॉजीसाठी आणि कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सध्याच्या लाइनअपमध्ये खालील सिरीज समाविष्ट आहेत:
  • 450 सिरील (स्पोर्टी सेगमेंट) यामध्ये Ather 450S(एंट्री-लेव्हल), Ather 450X आणि Ather 450 Apex यांचा समावेश आहे.
  • रिझ्ता सिरीज (फॅमिली सेगमेंट): ही एथरची नवीन आणि प्रॉक्टिकल स्कूटर लाइन-अपमध्ये आहे, ज्यामध्ये रिझ्ता झेड आणि रिझ्ता एस सारखे प्रकार आहेत. यात मोठी सीट आणि अधिक स्टोरेज स्पेस आहे.
  • या सर्व स्कूटरमध्ये टचस्क्रीन डॅशबोर्ड, नेव्हिगेशन, ओटीए अपडेट्स, ट्रॅक्शन कंट्रोल आणि फास्ट चार्जिंग सारख्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

एथर इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत यादी

  • अथर रिझ्टा या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत (अंदाजे) 1 लाख 9 हजार ते 1 लाख 45 हजार रूपये आहे.
  • एथर 450 एस या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 1 लाख 20 हजार ते 1 लाख 35 हजार रूपये आहे.
  • एथर 450 एक्सची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 1 लाख 41 हजार रूपये ते 1 लाख 57 हजार रूपये आहे.
  • अ‍ॅथर 450 अ‍ॅपेक्स या स्कूटरची किंमत 1 लाख 83 हजार रूपये ते 1 लाख 91 हजार रूपये आहे.

‘BaaS’ मॉडेलमुळे खर्च कमी होईल

एथरने ग्राहकांसाठी बॅटरी अ‍ॅज अ सर्व्हिस (BaaS) हा पर्याय देखील सादर केला आहे. जर ग्राहकांनी बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅन निवडला तर स्कूटरची सुरुवातीची किंमत लक्षणीयरीत्या कमी होते. या मॉडेल अंतर्गत, रिझ्टा 75,999 रूपयांपासून सुरू होऊ शकते आणि 450 सिरीज असलेल्या स्कूटरची किंमत 84,000 रूपयांपासून सुरू होऊ शकते.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.