‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत अखेर नको तेच घडलं; आकाशसमोर आलं सत्य

'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका दररोज रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

| Updated on: Nov 21, 2024 | 11:48 AM
1 / 6
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका एक मनोरंजक वळण घेत आहे. विशाखाला कळतं की लकी हाच शार्दुल आहे आणि बनी त्याचा मुलगा आहे.

2 / 6
ती डीएनए चाचणीद्वारे हे कन्फर्म करते आणि बनी हा खरोखरच लकीचा  मुलगा असल्याचं सिद्ध करते. त्या बदल्यात ती आकाशकडे पैशांची मागणी करते.

3 / 6
या सगळ्यात बनीचं अपहरण झालंय. अपहरणाच्या तपासाची जबाबदारी वसू घेते. बनी बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबाला धक्का बसलाय आणि वसू लकीवर अपहरण घडवून आणल्याचा जाहीर आरोप करते.

4 / 6
एका भावनिक क्षणात, वसू  लकीसोबतचं तिचं खरं नातं उघड करते. विशाखा आकाशला बनीसोबत एक व्हिडिओ कॉल दाखवते.

5 / 6
जयश्री आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करतेय, पण बनीला वाचवण्याचा आकाशचा निर्धार आहे. आकाश अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचतो त्याच क्षणी आकाशला गोळी लागते.

6 / 6
वसू आकाशला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जाते पण.. आकाशचा जीव वसू वाचवू शकेल? लकी आणि विशाखा त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होतील का? आकाश आणि वसूच्या नात्याचं भविष्य काय असेल? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील.