Maithili Thakur Rolls Royce: ४ कोटींची संपत्ती आणि १३ कोटींची कार; मैथिली ठाकुर निशाण्यावर, थेट आयकर विभाग…
Maithili Thakur Rolls Royce: बिहारमधील भाजप आमदार मैथिली ठाकूर अलीकडेच १३ कोटी रुपये किमतीच्या रोल्स-रॉइस कारमध्ये दिसल्या होत्या. त्यावरुन नवा वाद पेटला आहे.

लोकगायिका आणि बिहारच्या २६ वर्षीय आमदार मैथिली ठाकुर यांची सध्या लग्झरी कार रोल्स-रॉइसबाबत चर्चा सुरू आहे. अलीकडेच त्या मुंबईत लालबागचा राजाच्या दर्शनासाठी केल्या होत्या. त्यांची गाडी पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. दरम्यान, मैथिली ठाकुर यांच्या उत्पन्नाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सीए रुचिता वघानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, मैथिली ठाकुर यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात एकूण संपत्ती ४ कोटी रुपयांपेक्षा थोडी कमी दाखवली होती. आता त्यांच्याकडे १३ कोटी रुपयांची रोल्स-रॉइस कार आहे. सीए वघानी यांनी विचारले आहे की, ४ कोटींची नेटवर्थ असलेल्या व्यक्तीकडे १३ कोटींची कार कशी असू शकते?
सीए वघानी यांनी मैथिली ठाकुर यांच्या या प्रकरणात आपल्या पोस्टवर आयकर विभागालाही टॅग केले आहे. त्यांनी आयकर विभागाला सांगितले आहे की, त्यांनी मैथिली ठाकुर यांच्या उत्पन्नाची चौकशी करावी. शिवाय त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकरणांत सामान्य माणूसच का लक्ष्य बनतो? अशा आमदारांवरही कठोर कारवाई व्हायला हवी.
गेल्या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यात त्यांनी बिहारच्या अलीनगर जागेवरून निवडणूक लढवली होती आणि त्यांना विजय मिळाला होता. निवडणूक लढवताना मैथिली ठाकुर यांनी जे निवडणूक शपथपत्र सादर केले होते, त्यानुसार त्यांची संपत्ती 4 कोटी रुपयांपेक्षाही कमी होती.
मैथिली ठाकूर यांची एकूण संपत्ती ३,८२,३३,२५५ रुपये आहे. १,८०,७०० रुपये रोख, ७२,०७,४६५ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा, ३१,४२,७९४ रुपये म्युच्युअल फंड आणि इतर ठिकाणी गुंतवणूक, २०,००० रुपयांची स्कूटी, ५२,००,००० रुपये किमतीचे ४०९ ग्रॅम सोने आणि १.५० कोटी रुपये किमतीचा दिल्लीतील फ्लॅट.
सीए वघानी यांच्या या पोस्टवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ४ कोटींच्या उत्पन्नाच्या आमदारासाठी भारतात रोल्स-रॉइस खरेदी करणे शक्य नाही. कारण कंपनी नेहमी ग्राहकाची आधी स्थिती तपासते. ही लग्झरी कार फक्त तीच व्यक्ती खरेदी करू शकते, ज्याची नेटवर्थ सुमारे १०० कोटी रुपये असेल.