
आर. माधवन हे त्यांच्या आगामी द रेल्वे मेन या सीरिजमुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे या सीरिजचे जोरदार प्रमोशन हे देखील केले जात आहे. यामध्ये जूही चावला मुख्य भूमिकेत आहे.

नुकताच एक प्रमोशनमध्ये आर. माधवन यांनी अत्यंत मोठा खुलासा केलाय. आर. माधवन यांचे हे बोलणे ऐकून जूही चावला ही देखील हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

आर. माधवन म्हणाले की, आज मला मोठा खुलासा करायचा आहे. मी माझ्या आईला म्हटले होते की, मला जूही चावला हिच्यासोबत लग्न करायचे आहे.

मला खरोखरच जूही चावला हिच्यासोबत संसार करायचा होता. आर, माधवन यांचे हे बोलणे ऐकून काही वेळ जूही चावला ही शांत बसली आणि थेट जोरात हसायला लागली.

आता सध्या आर. माधवन यांनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहेत. अनेकांनी थेट विचारले की, खरोखरच आर. माधवन यांना जूही चावला हिच्यासोबत लग्न करायचे होते?