राधिका आपटेचा प्रचंड बोल्ड चित्रपट, ज्यातील सीन पाहून अंगावर येतो काटा, ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये होता चित्रपट
बॉलिवूडमधील बोल्ड चित्रपट, ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीने दिलेत प्रचंड बोल्ड सीन. सीन पाहून अंगावर येतो काटा. ओटीटीवर बघत आहेत लोक.

सध्या वेगळ्या आणि बोल्ड चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोठे सुपरस्टार असो वा नसोत, परंतु दमदार कथा आणि वेगळ्या मांडणीमुळे अनेक चित्रपट यशस्वी ठरत आहेत.

अशाच एका वेगळ्या आशयाच्या चित्रपटाने जगभरात प्रशंसा मिळवली असून तो आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चर्चेत आहे. अभिनेत्री राधिका आपटे हिच्या मुख्य भूमिकेतील 'सिस्टर मिडनाईट' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हा चित्रपट एक डार्क कॉमेडी प्रकारातील असून त्यात समाजातील रूढीवादी विचारसरणी, कायदे आणि सामाजिक बंधने यांना वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले आहेत. अनोखी कथा आणि वेगळी मांडणी यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही ट्रेंड होत आहे.

'सिस्टर मिडनाईट' या चित्रपटातील प्रत्येक सीन प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा आहे. या चित्रपटात राधिका आपटेने साकारलेली भूमिका खूप वेगळी आणि धाडसी आहे.

मात्र भारतात प्रदर्शित होताना या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाच्या काही आक्षेपांना सामोरे जावे लागले. विशेषतः नायिकेच्या काही नग्न सीनवर सेन्सॉर कट लावण्यात आले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षक बघत आहे.