
मराठीमोळी अभिनेत्री राधिका आपटेला आज भारतभरात ओळखले जाते. आपल्यातल्या कलागुणांच्या जोरावर तिने आज बॉलिवुडमध्ये स्वत:चे वेगले स्थान निर्माण केलेले आहे. आज जरी ती नामांकित अभिनेत्री असली तरी तिचा सुरूवातीचा प्रवास फारच खडतर होता. दरम्यान, याच राधिकाने तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.

गर्भवती असताना एका निर्माता तिच्यासोबत खूपच वाईट पद्धतीने वागला होता. मी गर्भवती असल्यासे समजताच त्या निर्मात्याला वाईट वाटले होते, असे राधिका आपटेने सांगितले आहे.

एकीकडे परदेशातील निर्माते माझे अभिनंदन करत होते. मात्र भारतातील एका निर्मात्याने मला डॉक्टरांनाही भेटू दिले नाही, असा धक्कादायक प्रसंग राधिका आपटेने सांगितला आहे.

राधिका आपटेने नुकतेच नेहा धुपियाच्या फ्रीडम टू फीड या लाईव्ह सेशनमध्ये हा प्रसंग सांगितला आहे. 'मी एका निर्मात्यासोबत काम करत होते. माझ्या गर्भधारणेमुळे तो निर्माता खुश नव्हता. माझे वजन वाढत होते. असे असूनही त्याने मला त्याच्या प्रोजेक्टसाठी गच्च कपडे परिधान करायला लावले,' अशी धक्कादायक आठवण राधिकाने सांगितली.

तसेच, मी तीन महिन्यांची गर्भवती होते. मला सतत काहीतरी खावसं वाटायचं. माझ्यात शारीरिक बदल होत होते. असे असतानाही माझ्या निर्मात्याने मला परेशान करून सोडलेह होते, अशी आठवण राधिकाने सांगितली.

पुढे बोलताना तरीदेखील मी ते सर्वकाही सहन करत होते. मात्र मला अस्वस्थ वाटत असल्याने मला डॉक्टरांकडे जायचे होते. पण त्या निर्मात्याने मला डॉक्टरांकडेही जाऊ दिले नाही, असेही राधिका आपटेने सांगितले आहे.