Radhika Apte चा अवघ्या 14 मिनिटांचा लघुपट, आजही अंगावर थरार आणतो, भन्नाट कथा आणि डायरेक्शनचा नमूना
जर तुम्ही थ्रिलर चित्रपटाचे चाहते असाल आणि कमी वेळात काहीतरी चांगले पाहायचे असेल तर तुम्ही राधिका आपटे हीचा हा थरारक लघुपट नक्कीच पहायला हवा. सुजॉय घोष दिग्दर्शित हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

साल २०१५ मध्ये दिग्दर्शक सुजॉय घोष यांची एक शॉर्ट थ्रिलर फिल्म प्रचंड गाजली होती. तिचे नाव होते 'अहल्या' (अहिल्या). या शॉर्ट फिल्सने सर्वांना भुरळ पाडली होती. रामायणच्या पौराणिक कथेवर आधारित या फिल्मला युट्युबवर २ कोटी ८० लाख वेळा पाहिले आहे. ही शॉर्ट फिल्म अहिल्याच्या पौराणिक कहाणीचे आधुनिक रुपांतर होती. त्यात स्रीवादी दृष्टीकोन देखील होता.

जर तुम्हाला थ्रिलर कहाणी आवडत असेल तर राधिका आपटची 'अहल्या' पाहू शकता, अनेकांनी ती पाहिली देखील असेल. साल २०१५ मध्ये रिलीज झालेल्या १४ मिनिटांच्या शॉर्ट फिल्मने जर दमदार कथा आणि दिग्दर्शन असेल तर काय चमत्कार घडू शकतो याचा नमूना ही फिल्म्स आहे.IMDb ने या लघुपटाला ७.९ रेटिंग दिले आहे.

सुजॉय घोष याच्या या शॉर्ट फिल्मला यूट्यूबवर 28 मिलियनहून अधिक व्यूज आहेत. यात राधिका आपटे (अहल्या), सौमित्र चटर्जी (गौतम साधु) आणि तोता रॉय चौधरी (इंद्र सेन) असे कसलेले कलाकार आहेत.या फिल्मचा क्लायमॅक्स अंगावर काटा आणणारा आहे.

राधिका आपटे हीचा हा लघुपट तुम्हाला चित्रपट या माध्यमाची ताकद दाखवेल, की अवघ्या १४ मिनिटातही दमदार आशयघन कथा कशी सादर केली जाऊ शकते या नमूना हा लघुपट आहे.

हा लघुपट तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल, जिथे तुम्हाला हॉरर किंवा भूताचा सामना न होताही तुम्हाला सनसनाटी शेवट पाहायला मिळेल. या चित्रपटाचा खरा नायक तर त्याची रहस्यमयी कथा आहे, जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवुन ठेवेल. तुम्ही "अहल्या" हा चित्रपट अमेझॉन प्राईम किंवा यूट्यूबवर मोफत पाहू शकता.