Radhika Ambani Look For Ganesh Utsav : सोन्याच्या जरीची साडी, पारंपरिक दागिने.. गणेशोत्सवात अंबानींच्या धाकट्या सुनेचा ‘रॉयल’ लूक चर्चेत

मुकेश आणि नीता अंबानी यांची धाकटी सून राधिका अंबानी तिच्या ग्रेसफुल लूक्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेते. यंदा गणेशोत्सवानिमित्त तिने खास गुलाबी रंगाचा आऊटफिट घातला, ज्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. तिचा संपूर्ण लूकच खास आहे.

| Updated on: Sep 15, 2026 | 2:16 PM
1 / 6
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ख्याती असलेले मुकेश अंबानी आणि कुटुंबीय प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांचं अँटिलिया हे निवासस्थानही बरंच चर्चेत असतं. सध्या सणासुदीचे दिवस असून गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अँटिलियामध्ये गणेशोत्सवाचा थाट माट पहायला मिळाला. भव्य सजावट, शानदार वातावरण आणि अंबानी कुटुंबीयांचे खास लूक्स यामुळे हा सोहळा पुन्हा एकदा चर्चेत आला. यंदाच्या गणेशोत्सवात अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट हिने आपल्या खास नृत्य सादरीकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. लाडक्या गणरायासाठी तिने ‘एकदंताय’ यावर भारतीय शास्त्रीय नृत्य सादर केलं. मात्र  जितकी चर्चा तिच्या नृत्याची झाली तेवढाच तिचा रॉयल आणि पारंपरिक लूकही चर्चेत होता.

2 / 6

राधिकाने यावेळी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली कांजीवरम सिल्क साडी नेसली होती. डीप ज्वेल पिंक रंगाची ही हाताने विणलेली साडी राधिकाच्या सौंदर्यात आणखी भर घालत होती. साडीचा रंग, त्यावरील नक्षीकाम आणि पारंपरिक दागिन्यांचा मेळ यामुळे तिचा संपूर्ण लूक अगदी राजेशाही भासत होता.

3 / 6

राधिका अंबानीच्या या साडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर करण्यात आलेली अप्रतिम कारागिरी. मनीष मल्होत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही साडी सोन्याच्या जरीने विणण्यात आली आहे. साडीवर अँटिक गोल्ड मरोडी एम्ब्रॉयडरी (Marodi Embroidery) देखील करण्यात आली असून, या पारंपरिक कलेमुळे साडीला एक वेगळाच शाही अंदाज मिळाला.

4 / 6

मरोडी एम्ब्रॉयडरी ही भारतातील प्राचीन आणि पारंपरिक हस्तकलेपैकी एक मानली जाते. या कलेचा संबंध विशेषतः राजस्थान आणि गुजरातच्या पारंपरिक कारागिरीशी जोडला जातो. ‘मरोड’ म्हणजे वळण किंवा गुंडाळणे. जरीचे धागे वळवून किंवा गुंडाळून त्यावर नाजूक टाके घातले जातात. त्यामुळे साखळीसारखे सुंदर नमुने तयार होतात आणि संपूर्ण डिझाइनला उठाव मिळतो.

5 / 6

मरोडी एम्ब्रॉयडरीसोबतच साडीवर जरदोसीची सुंदर कामगिरी करण्यात आली. सोन्याच्या जरीसोबत केलेल्या या नाजूक जरदोजी वर्कमुळे साडीला अधिक रॉयल मिळतो. प्रत्येक बारकाव्यात भारतीय हस्तकलेची झलक दिसून येते. विशेष म्हणजे राधिकाचा हा पोशाख केवळ दिसायला सुंदर असावा यासाठी तयार करण्यात आलेला नव्हता, तर तिच्या भारतीय शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणाचा विचार करून त्याची रचना करण्यात आली होती. त्यामुळे साडीचं ड्रेपिंग, तिची रचना आणि दागिन्यांची निवड यामध्ये सौंदर्यासोबतच नृत्याची गरजही लक्षात घेण्यात आली होती.

6 / 6

राधिकाने आपल्या साडीला मॅच करत पारंपरिक आणि रॉयल ज्वेलरीची निवड केली. कपाळावर मांगपट्टी, कानात सुंदर झुमके आणि गळ्यात डबल-लेयर नेकलेस असा तिच्या दागिन्यांचा अंदाज होता. हातात कंगन आणि कमरेला कमरबंद घालून तिने संपूर्ण लूकला पारंपरिक टच दिला. कमरबंदामुळे साडीची ड्रेपिंगही अधिक उठून दिसत होती. विशेषतः पदराची मांडणी अतिशय सुंदर करण्यात आली होती, ज्यामुळे नृत्य करतानाही पोशाखाचा ग्रेस कायम राहिला. डीप पिंक कांजीवरम साडी, सोन्याची जरी, अँटिक गोल्ड मरोडी एम्ब्रॉयडरी, जरदोजीचे काम, पारंपरिक दागिने आणि फुलांनी सजलेली हेअरस्टाइल—या सगळ्यांचा सुंदर मेळ राधिकाच्या लूकमध्ये पाहायला मिळाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us