
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे.

मेघडंबरी आणि होळीचा माळ येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळा ठिकाणी, जगदीश्वर मंदीर, समाधीस्थळ आणि शिकराई देवी मंदीर, राजसदरसहित रायगडवरील विविध वास्तू नेत्रदीपक रोषणाईने उजळून निघाल्या आहेत.

गेल्या शिवजयंती उत्सवात देखील डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन कडून नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती.

त्याच धर्तीवर यंदाही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर नेत्रदीपक रोषणाईने करण्यात आली आहे.

दरम्यान किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी आली आहे. आकर्षक रोषणाईने रायगडच्या सौंदर्यात भर पडली आहे.

याची दखल घेऊन खासदार डॉ.श्रीकांत शिंदेना युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

दरम्यान छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर आणि होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा, शिरकाई देवी मंदीर, जगदीश्वर मंदीर आणि समाधी स्थळाला रोज 5 पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.
