AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : महिना उलटूनही ‘राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी घोडदौड सुरूच; आतापर्यंत किती कमाई?

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाची कमाई अजूनही सुरू आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला थिएटरमध्ये महिना उलटला आहे. प्रदर्शनाच्या 33 व्या दिवशी किती कमाई झाली, ते पाहुयात..

| Updated on: Jun 03, 2026 | 2:40 PM
Share
रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट एक महिना उलटल्यानंतरही थिएटरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरील हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी पोहोचला आहे. विशेष म्हणजे अजूनही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे.

1 / 5
महिना उलटूनही 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या कलेक्शनला अद्याप ब्रेक लागलेला नाही. याचा अंदाज प्रदर्शनाच्या 33 व्या दिवशी झालेल्या कमाईवरून सहज लावला जाऊ शकतो. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, 33 व्या दिवशी या चित्रपटाने जवळपास 30 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.

2 / 5
मर्यादित शोज आणि इतर चित्रपटांशी टक्कर असूनही 'राजा शिवाजी' या चित्रपटाने कमावलेला हा आकडा उल्लेखनीय आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 105 कोटी रुपयांची कमाई केली असून जगभरातील कमाईचा आकडा 123 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चित्रपटाने नागराज मंजुळेंच्या 'सैराट'लाही मागे टाकलं आहे. सैराटने जगभरात 110 कोटी रुपये कमावले होते.

3 / 5
'राजा शिवाजी' या  चित्रपटाचं दिग्दर्शन खुद्द रितेश देशमुखनेच केलं आहे. यामध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मोठ फौज पहायला मिळते. रितेशसह जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी यांसारख्या कलाकारांनी यामध्ये भूमिका साकारल्या आहेत.

4 / 5
'राजा शिवाजी' या चित्रपटात रितेशसह त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी भूमिका साकारल्या आहेत. रितेश आणि जिनिलिया यांची मुलं रियान आणि राहील यांनी विविध टप्प्यांतील बाल शिवरायांच्या भूमिका साकारल्या आहेत. अमोल गुप्ते यांनीच या दोघांना कॅमेरासमोरच्या त्यांच्या पहिल्या अनुभवासाठी तयार केलं.

5 / 5
Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...