57 वर्षांपूर्वीचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट, डोकं चक्रावून टाकणारी कहाणी; एकही गाणं नसताना बनला बेस्ट म्युझिक डायरेक्टेड
57 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या राजेश खन्ना आणि नंदा यांच्या चित्रपटाने हिंदी सिनेमातील पारंपरिक पद्धतीला वेगळे वळण दिले. या चित्रपटात एकही गाणे नव्हते, तसेच मध्यंतरही ठेवण्यात आले नव्हते. तरीही रहस्य आणि उत्कंठेने भरलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. इतकेच नाही तर या गाण्यात गाणे नसुनही एका संगीतकाराला मिळालं बेस्ट म्युझिकचं क्रेडिट.

1969 मध्ये 10 ऑक्टोबर रोजी ‘इत्तेफाक’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. बी. आर. चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली, तर यश चोप्रा यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती.
या चित्रपटात राजेश खन्ना आणि नंदा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्यासोबत बिंदू, सुजीत कुमार, मदन पुरी आणि इफ्तेखार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
चित्रपटात गाणी नसली, तरी संगीताची जबाबदारी सलिल चौधरी यांच्याकडे होती. कथेला पुढे नेण्यासाठी गाण्यांऐवजी संवाद, रहस्य आणि कलाकारांच्या अभिनयावर अधिक भर देण्यात आला होता.
चित्रपटाची कथा दिलीप या पात्राभोवती फिरते, ज्याची भूमिका राजेश खन्ना यांनी साकारली होती. पत्नीच्या हत्येचा आरोप झाल्यानंतर तो पोलिसांपासून वाचण्यासाठी रेखा म्हणजेच नंदा यांच्या घरी पोहोचतो आणि त्यानंतर अनेक संशयास्पद घडामोडी घडतात
‘इत्तेफाक’मध्ये गाण्यांसोबत मध्यंतरही नव्हते, त्यामुळे प्रेक्षकांना अखंड कथा अनुभवता आली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला सेमी-हिट मानले गेले, तरी राजेश खन्ना यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्याची गणना केली जाते.