राजगडच्या पायथ्याशी आजही जपली जाते ही अनोखी परंपरा, पाहा खास फोटो

पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील कोळी महादेव आदिवासींनी साजरा केलेला हातरगी उत्सव सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे. हा उत्सव पारंपारिक शेतीतील तण काढणीला समर्पित असून, ढोल-ताशा आणि पारंपारिक नृत्यांसह साजरा केला जातो.

| Updated on: Aug 11, 2025 | 4:07 PM
1 / 6
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाड्यावर एक अनोखा आणि मनमोहक सोहळा नुकताच पार पडला. या ठिकाणी राहणाऱ्या कोळी महादेव आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक शेतीचा महत्त्वाचा भाग असलेला हातरगी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

2 / 6
सध्या शेतीत तण काढणी म्हणजेच खुरपणी सुरू आहे. याच कामाला उत्सवाचे स्वरूप देऊन सर्व आदिवासी बांधव एकत्र आले. या उत्सवात ढोलाच्या पारंपरिक तालावर नाचत-गाऊन शेतातील तण काढले जाते.

3 / 6
आदिवासींच्या भाषेत या सामूहिक कामाला 'पडकही' किंवा 'हातरगी' असे म्हणतात. यावेळी केवळ काम नाही, तर सामुदायिक आनंदाचा अनुभवही घेतला जातो. महाल गावातील जवळपास ७० ते ८० आदिवासी शेतकरी यात सहभागी झाले होते.

4 / 6
महिला आणि पुरुष पारंपरिक वेशभूषेत ढोलाच्या तालावर नाचत, गाणी म्हणत शेतीची कामे करत होते. कामाच्या या थकव्यातून ऊर्जा मिळवण्यासाठी आणि एकत्र येण्याचा आनंद घेण्यासाठी या काळात वनभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते.

5 / 6
आजही राजगड तालुक्यात डोंगर उतारावर पारंपारिक पद्धतीने नाचणी आणि वरईची शेती केली जाते. शहरी धावपळीपासून दूर असलेल्या या आदिवासी बांधवांनी आजही त्यांच्या संस्कृती, रुढी आणि परंपरा जपल्या आहेत.

6 / 6
त्यांचा हा अनोखा सामूहिक शेतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, अनेकजण या पारंपरिक उत्सवाचे कौतुक करत आहेत. हा उत्सव केवळ शेतीचे काम नसून, त्यांच्या सामूहिक भावना, एकोपा आणि निसर्गाशी जोडलेले त्यांचे अतूट नाते दर्शवतो.