
राखी सावंत हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे दिसत आहे. राखी सावंत हिच्यावर पती आदिल दुर्रानी याने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का हा बसला.

आदिल दुर्रानी याच्यासोबत सुरू असलेला वादामध्येच राखी सावंत ही आपल्या आयुष्यातील पहिला उमराह करण्यासाठी रवाना झाली. आता राखी सावंत हिचा उमराह पूर्ण झाला आहे.

आता सोशल मीडियावर राखी सावंत हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये राखी सावंत पांढऱ्या हिजाब आणि कपड्यांमध्ये दिसत आहे. यावेळी राखी सावंत हिला तिचे काही चाहते देखील भेटले.

यावेळी काही चाहते हे राखी या नावाने दिला आवाज देत होते. यावेळी राखी सावंत ही म्हणाली की, राखी नाही...फामिता बोला मला फातिमा. यानंतर लोक तिला फातिमा म्हणताना दिसले.

मक्का येथे राखी सावंत हिच्यासोबत तिचा भाऊ वाहिद अली खान आणि त्याची पत्नी देखील दिसत आहेत. राखी सावंत हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ देखील शेअर केलाय.