हा मागे उभा असलेला पोरगा माझाच पक्ष उद्ध्वस्त…थलपती विजयच्या विजयानंतर रामगोपाल वर्माची पोस्ट चर्चेत

थलपती विजयचा निवडणुकीत मोठा विजय झाला आहे. त्यानंतर त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. पण अशातच आता रामगोपाल वर्मा यांनी ट्विट करत विजयचा एक फोटो शेअर केला आहे.

| Updated on: May 05, 2026 | 2:36 PM
1 / 5
दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयचा विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या एका ट्विटने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयचा विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत असताना दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या एका ट्विटने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

2 / 5

राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करत एक हटके आणि सूचक टिप्पणी केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, हा मागे असलेला पोरगा माझाच पक्ष उद्ध्वस्त करेल. थलपती विजयच्या विजयानंतर रामगोपाल वर्माची पोस्ट चर्चेतसोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

3 / 5

थलपती विजयने राजकारणात पाऊल टाकल्यानंतर मिळवलेला हा मोठा विजय मानला जात आहे. त्याच्या या यशामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून अनेक सेलिब्रिटीही त्यांचे अभिनंदन करत आहेत.

4 / 5

वर्मा यांच्या या ट्विटनंतर नेटिझन्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या वक्तव्यामागील अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. फोटोच सर्व काही सांगतोय अशी प्रतिक्रिया देखील अनेकांनी दिली.

5 / 5

राम गोपाल वर्मा हे नेहमीच त्याच्या बेधडक आणि वेगळ्या शैलीतील वक्तव्यांसाठी ओळखले जातात. थलपती विजयच्या विजयानंतर केलेले हे ट्विटही त्याच धाटणीचे असून, सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us