बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेणारा टीव्ही अभिनेता, संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

Highest Paid TV Actor: छोट्या पडद्यावरून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केल्यानंतर एका अभिनेत्याने चित्रपटांमध्येही नशीब आजमावले. मोठ्या पडद्यावर त्याला छोट्या पडद्यासारखी ओळख मिळाली नसली, तरी वेळोवेळी तो चित्रपटांमध्ये दिसत राहिला आहे. त्याच्या एकूण संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

| Updated on: Sep 01, 2025 | 2:16 PM
1 / 8
कलाकार हे त्यांच्या लग्झरी आयुष्यासाठी ओळखले जातात. छोट्या पडद्यावरील काही कलाकारांची लोकप्रियता ही बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा जास्त आहे. एक अभिनेता तर असा आहे त्याने बॉलिवूड अभिनेत्यापेक्षाही जास्त मानधन घेतले आहे. आता हा अभिनेता कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

2 / 8
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून राम कपूर आहे. आज, 1 सप्टेंबर रोजी, टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता राम कपूरचा 52 वा वाढदिवस आहे. आपल्या वजनामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या राम कपूरने अलीकडील बदलाने सर्वांना थक्क केले होते. अभिनेत्याने कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय कित्येक किलो वजन कमी केले होते.

3 / 8
‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कसम से’, ‘घर एक मंदिर’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा राम कपूर ऐशोआरामाचे जीवन जगतो. तो सोशल मीडियावर आणि मुलाखतींमध्ये आपल्या आलिशान जीवनाची झलक शेअर करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

4 / 8
राम कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, टीव्हीवर काम करून त्याने अनेक पिढ्यांसाठी पैसे कमावले आहेत. 52 वर्षीय हा स्टार एकेकाळी छोट्या पडद्याचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता होता.

5 / 8
‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने टीव्हीवरील आपल्या कमाईबद्दल मोकळेपणाने वक्तव्य केले आहे. तो म्हणाला होता की, टेलिव्हिजन अभिनेते चित्रपट अभिनेत्यांइतके कमवू शकत नाहीत, पण जर तुमची मालिका 7-8 वर्षे चालली आणि तुम्ही टेलिव्हिजनच्या शिखरावर असाल, तर तुमचे एका महिन्याचे मानधन तुमच्या 8 वर्षांच्या पगाराएवढे असते.

6 / 8
राम कपूरने 2003 मध्ये गौतमी कपूरशी लग्न केले. अभिनेत्याची पत्नी टीव्ही विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव होती. तिने ‘घर एक मंदिर’ या मालिकेत राम कपूरसोबत मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय ती ‘खेलती है जिंदगी आंख मिचोली’ आणि ‘परवरिश’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली होती.

7 / 8
राम कपूरकडे अनेक आलिशान बंगले आणि लक्झरी गाड्या आहेत. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये फेरारी, पोर्श आणि लॅम्बॉर्गिनीचे टॉप मॉडेल्स समाविष्ट आहेत. तो आपल्या कुटुंबासह दक्षिण मुंबईत एका शानदार घरात राहतो आणि गोवा तसेच खंडाळ्यातही त्याची मालमत्ता आहे. त्याने अलीकडेच अलीबागमध्ये 20 कोटी रुपयांचा 4 बेडरूमचा भव्य व्हिला खरेदी केला आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, राम कपूर यांची एकूण संपत्ती 135 कोटी रुपये आहे.

8 / 8
राम कपूरने लोकप्रिय टीव्ही मालिकांसह ‘एजेंट विनोद’, ‘स्टूडेंट ऑफ द इयर’ आणि ‘हमशकल्स’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे, ज्यात त्यांच्या भूमिकांना खूप प्रशंसा मिळाली. अलीकडेच ते ‘मिस्त्री’ या ओटीटी मालिकेत दिसले होते, ज्यात त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.