AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्याने ऑनस्क्रीन वहिनीलाच बनवलं पत्नी; पतीपेक्षा चौपट कमावू लागल्याने आलेला दुरावा

अभिनेता राम कपूरने 26 वर्षांपूर्वी ऑनस्क्रीन वहिनीलाच खऱ्या आयुष्यातील पत्नी बनवलं होतं. अभिनेत्री गौतमी कपूर आणि राम कपूर हे एका मालिकेच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

| Updated on: Aug 31, 2026 | 12:19 PM
Share
'बडे अच्छे लगते हैं' या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारून अभिनेता राम कपूर घराघरात पोहोचला. नुकताच तो 'लॉक अप 2' या शोमुळे चर्चेत होता. अभिनयासोबतच राम त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतो.

1 / 5
राम कपूरचा जन्म 1 सप्टेंबर 1973 रोजी दिल्लीत झाला. त्याचे वडील अनिल कपूर प्रसिद्ध बिझनेसमन होते. रामनेही बिझनेसमध्ये मदत करावी, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. परंतु रामला अभिनयात रस होता. लॉकअप या शोमध्ये खुद्द रामने याचा खुलासा केला होता.

2 / 5
राम कपूरने 2002 मध्ये 'घर एक मंदिर' या मालिकेत काम केलं होतं. याच मालिकेच्या सेटवर त्याची अभिनेत्री गौतमी कपूरशी भेट झाली. या दोघांनी ऑनस्क्रीन दीर आणि वहिनीची भूमिका साकारली होती. मालिकेत एकत्र काम करता करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मालिकेत गौतमीच्या पतीचं निधन होतं आणि त्यानंतर तिचं लग्न दीराशी म्हणजेच राम कपूरशी होतं.

3 / 5
खऱ्या आयुष्यातही दोघांनी लगेचच 2003 मध्ये लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रामच्या करिअरमध्ये एक काळ असाही होता, जेव्हा दोन वर्षे त्याच्याकडे कोणतंच काम नव्हतं. वेळी गौतमी त्याच्यापेक्षा चारपट अधिक कमवत होती. या सर्व गोष्टींचा वैवाहिक आयुष्यावर परिणाम झाल्याचा खुलासा खुद्द गौतमीने एका मुलाखतीत केला होता.

4 / 5
"राम जवळपास अडीच वर्षे घरीच होता. त्याच्यासाठी ते खूप कठीण होतं. मी त्याची अस्वस्थता, चिंता पाहू शकत होते. त्यावेळी मला हे समजणं खूप कठीण होतं की तो घरी काहीही करत नाहीये. तो फक्त एका संधीची वाट पाहत होता. त्या काळात आमच्यात संवादच नव्हता", अशी कबुली गौतमीने दिली होती.

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे