साई पल्लवीपेक्षा हीच भारी.. फक्त एक झलक अन् चर्चाच चर्चा; कोण आहे ‘रामायण’मधील ही अभिनेत्री?

'रामायण'च्या ट्रेलरमध्ये साई पल्लवीपेक्षाही अधिक चर्चा तिच्या मागे उभी असलेल्या एका अभिनेत्रीची होत आहे. या अभिनेत्रीने साई पल्लवीलाही मागे टाकलंय, असं नेटकरी म्हणत आहेत. ही अभिनेत्री कोण आहे, ते जाणून घ्या..

| Updated on: Aug 02, 2026 | 9:10 AM
1 / 5
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मुख्य भूमिकांशिवाय चाहते हेसुद्धा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, या चित्रपटात सीतेच्या बहिणीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री आहे? या अभिनेत्रीने सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवीलाही मागे टाकलं आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे.

2 / 5
'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारणारी साई पल्लवी तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. परंतु ट्रेलरमधील तिच्या भूमिकेसाठी संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर काही जणांना तर तिच्यापेक्षा तिच्या मागे उभी असलेली अभिनेत्री जास्त आवडत आहे. ट्रेलरमधील साई पल्लवीच्या एण्ट्री सीनमध्ये तिच्यासोबत इतर दोन अभिनेत्री उभ्या आहेत. त्यापैकी डावीकडे उभ्या असलेल्या अभिनेत्रीची एक छोटीशी झलक समोर आली आहे आणि ती इंटरनेटवर लगेचच चर्चेचा विषय बनली आहे.

3 / 5
साई पल्लवीच्या मागे उभी असलेल्या या अभिनेत्रीचं नाव सुरभी दास असं आहे. ती एक आसामी अभिनेत्री असून रामाणय या चित्रपटात ती सीतेची धाकटी बहीण श्रुतकिर्तीची भूमिका साकारत आहे. 'पंड्या स्टोअर' आणि 'निमा डेंजोंगपा' यांसारख्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. सुरभीने सोशल मीडियावर स्पष्ट केलंय की ती चित्रपटात श्रुतकिर्तीची भूमिका साकारत आहे.

4 / 5
सुरभी दासने सांगितलं की, तिने सुरुवातीला प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या ऑफिसमध्ये या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. ऑडिशन दिल्यानंतर दोन महिन्यांनी तिला निर्मात्यांकडून फोन आला होता. त्यावेळी ती 'पंड्या स्टोअर' या मालिकेत काम करत होती. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सुरभीचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

5 / 5
हिंदी मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी सुरभीने आसामी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं होतं. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ती आसामहून मुंबईला आली होती. 'निमा डेंजोंगपा' या मालिकेतून तिने हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर 'पंड्या स्टोअर' या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us