Ranbir Kapoor – Alia Bhatt: आलिया – रणवीर यांचं 250 कोटी रुपयांचं आलिशान घर, दाखवली झलक पण काय होतेय ट्रोल?
Ranbir Kapoor - Alia Bhatt: अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. पण आता दोघे त्यांच्या आलिशान घरामुळे चर्चेत आले आहे. सध्या त्यांच्या 250 कोटी रुपयांच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी यंदाचा गणेशोत्सव त्यांच्या 'कृष्णराज' या बंगल्यात साजरा केला. जो मुंबईतील पाली हिल येथे स्थित आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या या बंगल्याची किंमत 250 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. याआधी जेव्हा घराचं बांधकाम सुरु होतं तेव्हा घराचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
याच बंगल्यात रणबीर - आलिया यांनी गणरायाची स्थापना केली आणि 19 सप्टेंबर रोजी विसर्जन केलं. यावेळी रणबीर यांनी आई नीतू कपूर, पत्नी आलिया आणि लेक राहा यांच्यासोबत पुजा केली.
आलिया हिने पूजेचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोतून त्यांचा कृष्णराज बंगला आतून किती भव्य आणि आलिशान आहे... हे देखील चाहत्यांना पाहता आलं.
फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, गणपती मखर पारंपरिक रित्या सजवण्यात आलं आह . फोटोमध्ये कपूर कुटुंबिय गणरायाची पूजा करताना दिसत आहेत.
आलिया आणि रणबीर यांच्या घरात एक गणरायाची मुर्ती ठेवली आहे. जी सर्वांचं लक्ष वेधून घेते...
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी घराचा प्रत्येक कोपरा महागड्या वस्तूंनी सजवला आहे. त्यांच्या बंगल्यातून मुंबईतील सर्वात आकर्षक दृश्य दिसतं.
सर्वत्र त्यांच्या घराची चर्चा असताना, अनेकांनी आलिया हिला ट्रोल केलं आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, आलिया मधल्या बोटाने बाप्पाला टिळा लावत आहे.
आलियाने मधल्या बोटाने टिळा लावल्यामुळे नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं. एवढंच नाही तर, याआधी अभिनेता रणबीर कपूर याला देखील प्रसादावरुन ट्रोल करण्यात आलं होतं.