Ramayana: हनुमान जयंतीदिनी ‘रामायण’मधील रामाची पहिली झलक; रणबीरचा लूक पाहून भारावले प्रेक्षक

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटातील अभिनेता रणबीर कपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात तू प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. फर्स्ट लूक टीझरमध्ये रावणाच्या भूमिकेचीही झलक पहायला मिळते.

| Updated on: Apr 02, 2026 | 10:13 AM
1 / 5
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या भव्य चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हनुमान जयंतीचं निमित्त साधत या चित्रपटातील रामाची झलक सादर करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे.

2 / 5
आठ वेळा ऑस्कर पुरस्कार विजेता व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओ डीएनईजी आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने हा भव्यदिव्य चित्रपट साकारण्यात आला आहे.

3 / 5
या टीझरमध्ये रामायणातील विविध घडामोडींची झलक पहायला मिळतेय. यातील जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्स विशेष लक्ष वेधून घेतात. या टीझरच्या अखेरीस रावणाच्या भूमिकेचीही पाठमोरी झलक आणि पुष्पक विमान दाखवण्यात आलं आहे.

4 / 5
हजारो वर्षांपासून जपली गेलेली रामायणाची कथा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर या चित्रपटातून मांडण्यात येत आहे. 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हणून पूजले जाणारे राम हे आदर्श मानवी आचरणाचे एक प्रतीक आहेत.

5 / 5
या चित्रपटात कलाकारांची मोठी फळीच पहायला मिळणार आहे. केजीएफ स्टार यश यामध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी, रवी दुबे, सनी देओल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us