
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर बॉलिवूडचे पॉव्हर कपल आहेत. आलिया आणि रणबीर लेक राहा कपूर हिच्यासोबत रॉयल आयुष्य जगतात. त्यांचं घरे देखील प्रचंड आलिशान आहे.

आलिया आणि रणबीर यांच्या घरातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द आलिया हिने नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून आलिया हिच्या नव्या घराचं बांधकाम सुरु होतं. आलिया आणि रणबीर कायम काम पाहण्यासाठी बांधकाम स्थळी जायचे. त्यांचे अनेकदा फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झालेत.

गृहप्रवेश करताना आलिया हिने फोटो पोस्ट केले आहेत आलिया आणि रणबीरच्या घरातील प्रत्येक कोपरा महागड्या वस्तूंनी सजवलेला आहे. आलिया कयम सोशल मीडियावर घरातील फोटो पोस्ट करत असते.

लेक राहा कपूर हिच्यासोबत आलिया हिने 250 कोटींच्या घरात गृहप्रवेश केला आहे. यावेळी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या फोटोसोबत देखील खास फोटो आलिया हिने पोस्ट केले आहेत. आलिया कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.