विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर… पुण्यात भरदिवसा दिसलं दुर्मिळ दृष्य, Exclusive Photo समोर

पुण्यातील भोर तालुक्यातील माळेगावात मादी लाल विंचू पिल्लांसह दिसली. 'विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर' ही म्हण प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळाली. भारतीय लाल विंचू (Hottentotta tamulus) हा विषारी असून, त्याचे मातृत्व दुर्मिळ आहे. वन्यजीव अभ्यासकांनी सुरक्षितपणे विंचू व पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडले. नागरिकांनी वन्यजीव संरक्षणासाठी सर्पमित्रांना संपर्क साधावा असे आवाहन.

| Updated on: May 18, 2026 | 1:27 PM
1 / 7
 विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर... ही म्हण तुम्ही आम्ही कित्येक वेळा ऐकली असेल. पण पुण्याच्या भोर तालुक्यातील माळेगाव गावातील लोकांना याचा याची देही याची डोळा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. माळेगाव गावात, मादी लाल विंचू पिल्लांसह आढळली. ग्रामस्थांना हे दुर्मिळ दृष्य प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. काहींनी ते लगेच कॅमेऱ्यातही कैद केलं.   निसर्गातील मातृत्व आणि वन्यजीवांचे अनोखे जीवनचक्र दाखवणारी निसर्गातील दुर्मिळ प्रकार नागरिकांनी अनुभवला .

2 / 7
माळेगाव येथील दौलत कोळी यांच्या घरी कांदा भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी घराशेजारी असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्याची, म्हणजेच डालग्याची साफसफाई सुरू असताना एका कोपऱ्यात विंचू दिसून आला. सुरुवातीला सामान्य विंचू असल्याचे वाटले; मात्र जवळून पाहिल्यानंतर त्या विंचूच्या पाठीवर अनेक लहान पिल्ले असल्याचे दिसून आले. त्यानंतर हे दुर्मिळ दृश्य उपस्थितांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केले .

3 / 7
विंचवाचे फोटो ज्येष्ठ सर्प अभ्यासक अनिल कानसकर यांना पाठविण्यात आले. फोटो पाहिल्यानंतर त्यांनी हा विंचू Hottentotta tamulus म्हणजेच भारतीय लाल विंचू असल्याचे सांगितले. - भारतीय लाल विंचू हा भारतातील अत्यंत विषारी विंचूंमध्ये गणला जातो. तो सहसा उष्ण, दमट आणि अंधाऱ्या जागांमध्ये राहतो. थेट सूर्यप्रकाश टाळण्यासाठी विंचू भेगा, खडकाखाली, लाकडांच्या ढिगाऱ्यात किंवा बिळांमध्ये लपून राहतात. ग्रामीण भागातील खुराडे, शेती परिसर आणि ओलसर जागा हे त्यांचे नैसर्गिक अधिवास मानले जातात.

4 / 7
 विंचवांच्या जीवनशैलीतील मातृत्वाची वागणूक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. पिल्लांच्या जन्मानंतर मादी विंचू त्यांना आपल्या पाठीवर घेऊन फिरते. या पिल्लांना “स्कॉर्पलिंग” असे म्हटले जाते. पिल्लांची पहिली कात टाकेपर्यंत त्यांचे संरक्षण आईकडून केले जाते. त्यामुळे “विंचूवाचे बिऱ्हाड पाठीवर” ही म्हण या घटनेत प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली..

5 / 7
 याची माहिती मिळताच पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे सदस्य श्रीकांत खेडकर आणि विशाल शिंदे त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी काळजीपूर्वक मादी विंचू आणि तिच्या पिल्लांना सुरक्षितरीत्या प्लास्टिकच्या जारमध्ये पकडले. त्यानंतर त्या विंचूला डोंगराळ आणि सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यामुळे तिच्या जीवनशैलीत कोणताही बदल होणार नाही तसेच पिल्लांची वाढ नैसर्गिक वातावरणात होईल, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली.

6 / 7
 निसर्गामध्ये अनेक अद्भुत आणि दुर्मिळ घटना घडत असतात; मात्र त्या प्रत्येक वेळी माणसांच्या नजरेस पडत नाहीत. माळेगावातील या घटनेमुळे वन्यजीवांविषयी जागरूकता निर्माण झाली असून ग्रामस्थांनीही अशा प्राण्यांना इजा न करता तज्ज्ञ किंवा सर्पमित्रांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

7 / 7
 मादी विंचू आपल्या पिल्लांना पाठीवर घेऊन फिरताना दिसणे ही निसर्गातील दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण घटना आहे. अशा वेळी नागरिकांनी विंचू मारण्याचा प्रयत्न न करता तज्ज्ञ किंवा सर्पमित्रांना संपर्क करावा.. असं आवाहन पर्यावरण प्रेमिंनी केलं आहे.

Follow Us