
भौतिक सुखसुविधेचे स्वामी शुक्र येत्या 15 सप्टेंबर रोजी सिंह राशीत गोचर करणार आहेत. या राशीत अगोदरच राजकुमार गुरु ग्रह अगोदरपासूनच विराजमान आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि शुक्र ग्रह जेव्हा एका राशीत येतात तेव्हा लक्ष्मी-नारायण राजयोग तयार होतो. बुध आणि शुक्र ग्रहाच्या या अनोख्या युतीमुळे मिथून, कन्या तसेच अन्य राशींवर परिणाम पडणार आहे.

मिथून राशीला बुध आणि शुक्रदेवाचा लक्ष्मी-नारायण राजयोग लाभदायी ठरणार आहे. याच राजयोगामुळे मिथून राशीच्या लोकांच्या संपत्तीत मोठी वाढ होईल. तसेच त्यांना मोठा सन्मान मिळेल. या राजयोगामुळे सरकारी नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे.

सिंह राशीच्या लोकांसाठीही लक्ष्मी नारायण राजयोग लाभदायी ठरणार आहे. संपत्तीच्या बाबतीत आखलेली एखादी योजना चांगले परिणाम देईल. त्यामुळे वर्षाच्या शेवटी काही चांगली बातमी येईल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांची चांगली प्रगती होईल. तसेच व्यापाऱ्यांनाही मोठा फायदा होईल.

कन्या राशीच्या लोकांसाठीही हा लक्ष्मी-नारायण राजयोग चांगलाच फलदायी ठरण्याची शक्यता आहे. या राजयोगामुले कन्या राशीच्या लोकांच्या सर्व चिंता दूर होतील. स्वत:चं घर घेण्यासाठी सामर्थ्य निर्माण होईल. नोकरी, व्यवसाय यात मोठी प्रगती होईल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.