
17 जुलै 2025, गुरुवार हा एक खास दिवस आहे. गुरुवारी सप्तमी तिथी आहे. गुरुवार हा दिवस अनेक राशींसाठी फायदेशीर ठरु शकतो. गुरुवारी रेवती नक्षत्राचा योग जुळून येत आहे. गुरुवारी चंद्र मीन राशीत असेल. गुरुवारी कोणत्या राशींना नशिबाची साथ मिळू शकते? याबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

वृषभ रास : गुरुवारचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहिल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याचे संकेत आहेत. कुटुंबासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात कुटुंबांची साथ-सहकार्य मिळेल. कामं वेळेत होऊ शकतात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

सिंह रास : सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुवार शुभ दिवस ठरु शकतो. गुरूच्या आशीर्वादामुळे कामात यश मिळू शकतं. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

तुळ राशी : तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला ठरु शकतो. चांगल्या योगामुळे रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. कुटुंबियांसोबत वेळ घालवता येईल. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल, त्यामुळे आनंद द्विगुणीत होईल. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

धनु राशी : धनु राशीसाठी 17 जुलै शुभ ठरु शकतो. गुरु ग्रहाच्या आशिर्वादामुळे लाभ होऊ शकतो. या दिवशी प्रवास करण्याची शक्यता आहे. प्रवासामुळे ज्ञानात भर पडेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

मीन राशी : गुरुवारी चंद्र मीन राशीत असेल. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना आत्मिक आणि मानसिक शांती मिळू शकते. अडकलेले पैसे मिळू शकतील. आरोग्यात सुधारणा दिसेल. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh) (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. वरील तथ्यांबद्दल TV9 Marathi कोणताही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)