
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आजच्या दिवस निवांत राहील. कामं वेळेत आटोपल्याने आराम करता येईल. कुटुंबासोबत वेळ व्यतित करा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग निळा राहील.

कधी कधी जवळचे मित्र दगाफटका करतात. त्यामुळे आर्थिक नुकसान होईल. पण आता पश्चाताप करून काहीच फायदा होणार नाही. शुभ अकं 20 आणि शुभ रंग नारंगी राहील.

समाजात वावरताना काही तत्त्व पाळणं गरजेचं आहे. प्रत्येक बाब आपल्या बाजूने येईल असं नाही. दानधर्म करण्याकडे लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

नशिबाची साथ आज मिळेल. काही अशक्य कामंही पूर्ण होताना दिसेल. मदत केलेल्या माणसांना विसरू नका. त्यांचे वेळ येईल तेव्हा ऋण फेडा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

काही कामं विचार करून पूर्ण होत नाही त्यासाठी प्रत्यक्ष कृती करणं गरजेचं आहे. व्यवस्थापन करून कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग केसरी राहील.

शनिवार असल्याने शनि मंदिरात जाऊन पूजा अर्चना करा. तसेच आतापर्यंत आलेलं संकट सौम्य करण्यासाठी प्रार्थना करा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

कोणत्याही कामासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. अशीच कोणती कामं होत नसतात. मेहनत घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे जा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग हिरवा राहील.

नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा दिवस योग्य नाही. धीर धरा. आतातायीपणे वागू नका. आपलं लक्ष्य गाठण्यासाठी सातत्य महत्त्वाचं असतं. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

उगाचचं टेन्शन घेऊन काही होणार नाही. झालं ते विसरून जा आणि कामाला लागा. आर्थिक गणित बिघडलं तरी सुरुवात करणं गरजेचं आहे. शुभ अंक 9 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)