
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आज उत्साहात एखाद्या कामाला सुरुवात करू शकता. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. प्रगती दिसून येत असल्याने तुम्हीही त्यावर काम कराल. कामाचं नेटवर्क मजबूत राहील. शुभ अंक 1 आणि शुभ रंग निळा राहील.

कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त राहाल. नातेवाईकांकडून चांगल्या बातम्या कानावर पडतील. मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. वाद विवाद होईल असं वागू नका. लोकांशी नम्रतेने वागा. शुभ रंग 16 आणि शुभ रंग काळा राहील.

आज आत्मविश्वास दुणावलेला राहील. आरोग्य आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. घरातील काही गोष्टींसाठी पैसा खर्च करावा लागेल. प्रवासाचा योग जुळून येईल. शुभ रंग 6 आणि शुभ रंग हिरवा राहील.

आज दिवस आळसावलेला राहील. काही कामातून हवा तसा फिडबॅक मिळणार नाही. गुप्त शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा आणि गुंतवणुकीपासून सावध राहा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

भागीदाराच्या व्यवसायातून चांगलं उत्पन्न हाती पडेल. तसेच नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पाठीवर पडेल. समाजात मानसन्मान वाढेल. अविवाहित लोकांना चांगलं स्थळ येऊ शकते. शुभ अंक 10 आणि शुभ रंग केसरी राहील.

दिवसभर कामात व्यस्त राहाल. त्यामुळे एखाद्या कामाचा योग्य परिणाम दिसत नाही तोपर्यंत अस्वस्थता राहील. दिवस संपेपर्यंत योग्य तो निर्णय हाती पडेल. रात्री चांगली झोप लागेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग लाल राहील.

आज नशिबाची चांगली साथ मिळेल असं ग्रहमान आहे. काही कामात थोड्याशा मेहनतीने यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती दिसेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.शुभ अंक 34 आणि शुभ रंग हिरवा राहील.

आज विरोधक आणि गुप्त शत्रूंपासून सावध राहा. वाद होईल असं वागू नका. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रोमँटिक क्षणांचा आनंद घ्याल. शुभ अंक 20 आणि शुभ रंग लाल राहील.

आज प्रसन्न आणि आत्मविश्वास दुणावलेला राहील. स्वत:चं परीक्षण करा आणि त्या दृष्टीने पावलं उचला. समोर असलेल्या अडचणींचा सामना करा. प्रत्येक क्षणांचा आनंद लुटा. शुभ अक 3 आणि शुभ रंग चंदेरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)