
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आर्थिक गणित आज सुटल्याने दिलासा मिळेल. काही जुनी देणी आज देऊन टाकली तर बरं होईल. कुटुंबासोबत आपलं दु:ख शेअर करा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

समाजात वावरताना आज तुम्हाला सकारात्मक वाटेल. काहीतरी पुण्याचं काम हातून घडू शकतं. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. काही गोड बातमी कानावर पडू शकते. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष केंद्रीत करा.त्यांची काळजी घ्या. कारण लक्षात ठेवा की, चिडचिडा स्वभाव आणि तुमच्या वागण्यामुळे त्यांना त्रास होतो. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल. आराम करा आणि आध्यात्मिक दृष्टीकोनातून चिंतन करा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

काही कारणास्तव मनात भीती राहील. त्यामुळे कामात मन लागणार नाही. होणारं कामं होत नसल्याने स्वभाव चिडचिडा होईल. विनाकारण घरच्यांवर राग काढू नका. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. भौतिक सुख उपभोगण्याची संधी मिळेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

प्रत्येक निर्णय भावुक होऊन घेणं अंगाशी येऊ शकतं. जिथे चुकते तिथे बोला आणि प्रश्न सोडवा. अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

कठोर परिश्रमाचं अपेक्षित तुम्हाला आज मिळेल. यामुळे तुमची छबी आणखी सुधारेल. समाजात मानसन्मान वाढेल. काही ठिकाणी तुमच्या कामाचा गौरव होईल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

मित्रांच्या भेटीगाठी आज होतील. त्यामुळे दिवस एकदम मस्त जाईल. जुन्या आठवणी जागा झाल्यामुळे उत्साही वाटेल. आत्मविश्वासात दुपटीने वाढ होईल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)