
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आजचा दिवस आनंदाचा असेल. तुमच्यावर एखाद्या गोष्टीचा तणाव असेल तर चर्चा करा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. भविष्यासाठी आर्थिक योजनांबद्दल तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलू शकता. कोणालाही पैसे देण्याचे टाळा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

तब्येतीत काही अडचण येत असेल तर त्यांच्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रतिमा सुधारेल. तुम्हाला जर एखादं काम मार्गी लावायचं असेल तर ते एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून मदत घ्या. हा निर्णय तुमच्यासाठी चांगला ठरेल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

आजचा दिवस संमिश्र असा जाणार आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडेही लक्ष द्यावे लागेल. अन्यथा घरात कलह निर्माण होऊ शकतात. तुमची वाईट प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

व्यवसायात काही अडथळे असतील तर ते दूर करा. धार्मिक यात्रेला जाण्याची तयारी करू शकता. तुमच्या सुखसोयींच्या वस्तू खरेदीवर तुमचा खूप पैसाही खर्च होईल.व्यवसायाच्या विचारात असाल तर काही योजना राबवू शकता. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आजचा दिवस दनिराशाजनक असणार आहे. कोणासमोर आपली अडचण सांगू नका. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. लोकांना तुमच्याबद्दल काहीतरी वाईट वाटू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते.आईच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

यशासाठी आजचा दिवस उत्तम राहील. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. एखाद्याला सहलीला घेऊन जाण्याची योजना आखू शकता. आईच्या तब्येतीबाबत काळजी घ्या. पाय दुखणे इत्यादी काही समस्या तिला त्रास देऊ शकतात. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

आजचा दिवस व्यस्त असणार आहे. तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामांवर पूर्ण लक्ष द्यावे लागेल, अन्यथा ते अडचण निर्माण होऊ शकते. तुमचे एखादे सरकारी काम खूप दिवसांपासून अडकलं असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. कोणत्याही वादविवादाच्या प्रसंगात पडू नका. न्यायलयाची पायरी चढावी लागू शकते. भाऊ-बहिणींसोबत कोणत्याही मुद्द्यावरून मतभेद झाले असतील तर ते आज संपुष्टात येतील. अविवाहित लोकांसाठी चांगले लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

तुमची आर्थिक स्थिती मजबूत करणारा हा दिवस आहे. तुमचे काही शत्रू तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबातील कोणाला काही सल्ला दिल्यास नीट विचार करूनच सांगा अन्यथा तुमच्या अंगाशी येऊ शकते. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)