
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आपलं कुटुंब संकटात असलं की जीव कासावीस होतो. तसेच जवळच्या नातेवाईकांनी पाठ फिरवली की अस्वस्थ होतो. अशी सर्व परीक्षा बघणारा आजचा दिवस आहे. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

कधी कधी काहीही न करता आपल्या पदरी यश पडतं. त्यामुळे आपण यशाचे वाटेकरी ठरलो याचा आनंद होतो. ग्रहांची स्थिती उत्तम असून अंकांची साथ मिळेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग ग्रे राहील.

नवीन काही सुरु करण्यासाठी वेळ पाहण्याची गरज नसते. निश्चय करा आणि पुढच्या कामाला लागा. वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष केंद्रीत करा. बाकींच्याचं भलं करण्यात अर्थ नाही. शुभ अंक 7 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

आपण आपल्या कामात परफेक्ट असलो की कसलंच टेन्शन राहात नाही. दुसऱ्यावर अवलंबून राहून आपण आपलंच नुकसान करत असतो. आखलेल्या योजनांवर काम करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आपण करत असलेल्या कामाचं आत्मपरीक्षण करा. आपल्यामुळे कोणाचं नुकसान तर होत नाही ना याची काळजी घ्या. अन्यथा त्या नफ्याला काहीच अर्थ उरणार नाही. शुभ अंक 11 आणि शुभ रंग निळा राहील.

आपल्याला कौटुंबिक पातळीवर लक्ष द्यावं लागेल. कारण आपल्या शब्दांना मान आहे हे लक्षात ठेवा. अति उत्साहात आर्थिक जोखिम घेण्याच्या भानगडीत पडू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

मित्रांसोबत आजचा दिवस व्यतित करण्याची संधी मिळेल. त्यामुळे शाळा कॉलेजातल्या आठवणींना उजाळा मिळेल. एखाद्या जुन्या मैत्रिणींबाबत दु:खद माहिती मिळाल्याने अस्वस्थ व्हाल. शुभ अंक 17 आणि शुभ रंग लाल राहील.

आर्थिक स्थिती मजबूत करणारा आजचा दिवस आहे. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. आपली प्रतिष्ठा राखा. चुकीच्या कामांमुळे नावलौकिक धुळीस मिळेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

कोणतंही नातं हे विश्वासावर टिकतं. जिथे विश्वासाला तडा जातो तेथे तेथे नातं उरत नाही. त्यामुळे विनाकारण संशय घेणं सोडून द्या. आत्मविश्वासाने हाती घेतलेली कामं पूर्ण करा. शुभ अंक 25 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)