
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

एखादं काम घाईगडबडीत केलं की फटका बसतो. त्यामुळे शांत डोक्याने काम करा. निश्चितच ते पूर्णत्वास जाईल. आत्मविश्वास वाढेल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती थोडी खालावलेली राहील. पण योग्य कामासाठी पैसे खर्च होतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग नारंगी राहील.

नव्या लोकांच्या ओळखी होतील. यामुळे कामं पूर्णत्वास जातील. नवीन आर्थिक स्रोत या काळात निर्माण होतील. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग हिरवा राहील.

जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नका. भविष्यातील घडामोडींचा अंदाज येऊ शकतो. काळजीपूर्वक आर्थिक नियोजन करा. थेंबे थेंबे तळे साचे हे लक्षात ठेवा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

तुमच्या कामाचं फळ तुम्हाला निश्चितच मिळेल हे लक्षात ठेवा. त्यामुळे काम करत राहा. वरिष्ठांची तुमच्यावर नजर असेल. पगारवाढ होऊ शकते. शुभ अंक 9 आणि शुभ रंग नारंगी राहील.

शत्रूपक्षाकडून आज काही दगाफटका होऊ शकतो. त्यामुळे सावध राहा. कोणतीही चुकीची गोष्ट आपल्या हातून घडेल असं वागू नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लाल राहील.

वाहन चालवताना काळजी घ्या. लांबचा प्रवास शक्यतो टाळा. कारण अपघात होण्याची शक्यता आहे. आराम करा आणि फोनवरूनच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

हाती आलेली संधी सोडू नका. संधीचं सोनं करा.भविष्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्यविषयक तक्रारीमुळे डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग केसरी राहील.

आपल्याकडून काम करून घेण्यासाठी इतर लोकांचा आटापिटा असेल. त्यामुळे काम करताना आपला वापर होत नाही ना याची काळजी घ्या. फायदा होत असेल तर नक्कीच कामं हाती घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)