
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आज तुमचा उत्साह वाढेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल. तुमच्या व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.

नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील.तुमच्या व्यवसायात फायदा होईल. आर्थिक बळ मिळेल. तुम्हाला काही मोठे फायदे मिळू शकतात. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होतील. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला प्रेम आणि आदर मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळा.तुम्ही काही नवीन योजनांवर काम कराल, ज्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.विविध स्रोतांमधून उत्पन्न वाढेल. विशेष कामावर खर्चही होऊ शकतो. शुभ अंक 5 आणि शुभ रंग जांभळा राहील.

तुम्हाला काही भावनिक आव्हानांचा सामना करावा लागेल. कुटुंबाच्या सुखाची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न कराल. न्यायालयीन खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.

आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एखादा चांगला प्रकल्प मिळू शकतो. शुभ अंक 10 आणि शुभ रंग जांभळा राहील.

आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्याल. तुम्ही तुमची पूर्ण प्रतिभा दाखवाल. याचा तुम्हाला फायदा होईल. विरोधक काही समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागू शकते.नोकरीत तुम्हाला तुमच्या बॉसचे सहकार्य मिळेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.

तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणणारा दिवस आहे.तुम्हाला तुमच्या जीवनात महत्त्वाचे बदल दिसतील. चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.बिझनेस संबंधी काही प्रवास होऊ शकतो. शुभ अंक 1 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)