

ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रह योग्य स्थितीत असणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी फार महत्त्वाचं असतं. तसेच प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. तसेच प्रत्येक राशीत कोणता न कोणता ग्रह उच्च स्थानी असतोच. (Photo Credit : Tv9)

त्यानुसार मंगळ ग्रहाच्या अखत्यारीत 2 राशी येतात. या 2 राशींमध्ये मेष आणि वृश्चिक राशीचा समावेश आहे. तसेच मकर राशीत मंगळ ग्रह सर्वोच्च स्थानी असतो. त्यामुळे मेष, वृश्चिक आणि मकर या 3 राशी मंगळ ग्रहाच्या प्रिय आहेत, असं म्हणू शकतो. याबाबत सविस्तरित्या जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार,मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांवर मंगळाचा शुभ प्रभाव असतो. मेष राशी ही या ग्रहाची मूळ त्रिकोण राशी आहे, ज्यामुळे मंगळाचा थेट परिणाम या राशीच्या लोकांवर होतो. या राशीची लोकं उत्साही, धाडसी आणि नेतृत्वगुणांनी परिपूर्ण असतात. तसेच या राशीची लोकं आव्हानात्मक काळात डगमगत नाहीत. तसेच दुसऱ्यांना प्रोत्साहित करतात. (Photo Credit : Tv9)

मंगळ ग्रह वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर मंगळाचा सकारात्मक प्रभाव असतो. वृश्चिक राशी माणसं उर्जावान तसेच प्रंचड उत्साही असतात. संपूर्ण उत्साहाने ही मंडळ कामं करतात. कोणत्याही आणि कशाही स्थितीत घाबरत नाहीत. या राशीची लोकं यशाकडे वाटचाल करतात. ही लोकं धाडसी असतात. मंगळाच्या प्रभावामुळे ही लोकं शत्रूंकडून सूड घेतात. (Photo Credit : Tv9)

मकर राशीच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा आशीर्वाद कायम असतो. मकर सर्व राशींपैकी एक अशी राशी आहे जी मंगळ ग्रहाला सर्वोच्च स्थान देतं. त्यामुळे मंगळ ग्रहाच्या कृपेमुळे मकर राशीचे लोकं धीरोदात्त असतात. तसेच ती शिस्तप्रिय असतात. तसेच मकर राशीची लोकं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असतात. मकर राशीची लोकं त्यांच्या करियरमध्ये वेगाने प्रगती करतात. (Photo Credit : Tv9) (Disclaimer: वरील माहिती ही सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.)