
ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत शुभ ग्रह म्हणून ओळखला जाणारा शुक्र हा भौतिक सुखे, भावनिक संतुलन आणि समृद्धीचा मुख्य कारक आहे. त्याच्या प्रभावामुळे जीवनात सौंदर्य, कला, प्रेमसंबंध आणि आर्थिक प्रगती येते. विलासी वस्तू, आकर्षक वस्त्रे, दागिने, वाहने आणि घरगुती सुख-सुविधा यांचा संबंध शुक्राशी जोडला जातो. व्यवसायातील यश, सद्भावना आणि आकर्षणशक्तीही शुक्राच्या प्रभावावर अवलंबून असते.

सुख, समृद्धी आणि प्रेमाचे प्रतिनिधित्व करणारा हा शुक्र ग्रह 11 डिसेंबर 2025 रोजी मावळला आहे. शुक्र मावळण्याच्या खगोलीय घटनेला ज्योतिषशास्त्रात "शुक्र तारा मावळ" म्हणून ओळखले जाते. या पुढचे ५३ दिवस शुक्र ग्रह या अवस्थेत राहील. त्यामुळे याचा नकारात्मक परिणाम राशी चक्रातल्या 3 राशींवर होणार आहे. त्या 3 राशी कोणत्या ते पाहूया.

शुक्र हा तूळ राशीचा स्वामी असल्याने त्याच्या अस्तामुळे या राशीला सर्वाधिक आव्हाने येतील. मानसिक अशांतता वाढू शकते, प्रेमसंबंधात गैरसमज किंवा अंतर येऊ शकते. खर्च अनियंत्रित वाढतील, प्रिय वस्तू हरवण्याची भीती राहील. वैवाहिक जीवनात किरकोळ कारणांवरून तणाव निर्माण होऊ शकतो. शुभ कार्यांत अडथळे येतील. संयम ठेवा, शांतपणे संवाद साधा आणि साधेपणाने वागा, परिस्थिती लवकर सुधारेल.

वृश्चिक राशीला शुक्र अस्ताचा थेट परिणाम नातेसंबंध आणि भागीदारीवर होईल. वैवाहिक जीवनात अस्वस्थता जाणवेल, जोडीदाराशी संवाद बिघडू शकतो. खर्च वाढून बचत कमी होईल. चिंता आणि अनिर्णयामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. प्रेम जीवनात अस्थिरता येऊ शकते. नात्यात कठोर शब्द टाळा. हा काळ आत्मचिंतन आणि संयमाचा आहे.

मकर राशीला घरगुती आणि वैयक्तिक जीवनात गुंतागुंत निर्माण होईल. घरातील वातावरण तणावपूर्ण राहू शकते, जवळच्या व्यक्तींशी मतभेद होतील. प्रेमसंबंधात भावनिक असंतुलन आणि अंतर जाणवेल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. कामात मंदी आणि निर्णयक्षमतेत अनिश्चितता येऊ शकते. शांतता, संयम आणि विवेकाने परिस्थिती हाताळा. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)