AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिकन, बिर्याणी, पनीर…हॉटेलच्या मेन्यूमधून खाद्यपदार्थ गायब; भारतात असं पहिल्यांदाच घडलं; कारण काय?

इराण-इस्रायल युद्धाचा मोठा फटका भारतीयांना बसत आहे. भारतात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेस्टॉरंट व्यावसायिकांचा मोठा तोटा होत आहे.

चिकन, बिर्याणी, पनीर...हॉटेलच्या मेन्यूमधून खाद्यपदार्थ गायब; भारतात असं पहिल्यांदाच घडलं; कारण काय?
lpg gas cylinder shortageImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 12, 2026 | 9:31 PM
Share

LPG Shortage : भारतापासून हजारो किलोमीटर दूर इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. परंतु या युद्धाची झळ भारताला बसायला लागली आहे. भारताच्या जवळजळव प्रत्येक घरात गॅस सिलिंडरचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळेच अनेक घरांमध्ये स्वयंपाक कसा बनवायचा? असा सवाल उपस्थित केला जातोय. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने भारतात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी फक्त कुटुंबंच नव्हे तर हॉटेल, रेस्टॉरंट्स, कॅन्टीवरही त्याचा परिणाम झाला आहे. वेगवेगळे पदार्थ तयार करायला गॅसच नसल्याने हॉटेल, कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ कमी करण्यात आले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयापासून ते मुंबईत हॉटेल्सपर्यंत यातून कोणीही सुटलेले नाही. दिल्ली उच्च न्यायालयातील कॅन्टीनमध्ये तर बिर्याणी, दाल मखनी, शाही पनीर यासारखे पदार्थ मिळणे बंद झाले आहे.

कुठं काय परिणाम झाला?

गॅस सिलिंडरच्या कमतरतेचा फटका देशभरातील कॅन्टीन, हॉटेल्सना बसला आहे. देशातील साधारण 90 टक्के रेस्टॉरंट हे एलपीजी गॅस सिलिंडच्या मदतीने खाद्यपदार्थ तयार करतात. परंतु आता गॅस सिलिंडरच उपलब्ध नसल्याने वेगवेगळे मेन्यू असणारे खाद्यपदार्थ तयार तरी कसे करावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता अनेक रेस्टॉरंट्समध्ये गॅस सिलिंडरच्या मदतीने तयार केले जाणारे पदार्थच मेन्यूमधून हटवून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी तंदुरी चिकन, पनीर टिक्का, नान, तंदूर असे पदार्थ मात्र अजूनही रेस्टॉरंटमध्ये मिळत आहेत.

बिर्याणी, दाल मखनी, शाही पनीर मेन्यूमधून गायब

दिल्ली उच्च न्यायालयातील कॅन्टीनमध्ये सर्व वकील जेवणाचा आस्वाद घेतात. परंतु एलपीजीच्या कमतरतेमुळे तिथेही बिर्याणी, दाल मखनी, शाही पनीर यासारखे मेन कोर्स खाद्यपदार्थ मेन्यूमधून हटवण्यात आले आहेत. कॅन्टीनतर्फे तसे निवेदनच जारी करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर साधा समोसादेखील तिथे मिळत नाहीये.

हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांचे मोठे नुकसान

दरम्यान, आता हे खाद्यपदार्थच खायला मिळत नसल्याने आता नेमकं काय करावं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे एलपीजीच्या कमतरतेमुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार