AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती पुळेमध्ये प्रसाद बंद, अकोल्यात LPG गॅस पंपाला कुलूप, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली; कुठे काय घडतंय?

इराण इस्रायल यांच्यातील युद्धामुळे भारताला मोठी झळ बसत आहे. महाराष्ट्रात तर घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे. सोबतच काळ्या बाजारात गॅस सिलिंडर चढ्या भावात विकले जात आहेत.

गणपती पुळेमध्ये प्रसाद बंद, अकोल्यात LPG गॅस पंपाला कुलूप, गॅस टंचाईमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली; कुठे काय घडतंय?
lpg gasImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 12, 2026 | 7:11 PM
Share

Iran Israel War : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा भडका उडालेला असून त्याची धग ही भारतालाही जाणवत आहे. विशेष म्हणजे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांत युद्ध चालू असलं तरी महाराष्ट्रातील गावकुसात राहणारा नागरिक याने होरपळून निघत आहे. राज्यभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडरची किंमत महागली आहे. सोबतच अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळाबाजारही समोर आला आहे. कोकणापासून ते बीडपर्यंत गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने नागरिक परेशना आहेत. कोकणातील गणपतीपुळे देवस्थानात लाडूचा प्रसाद बंद करण्यात आला आहे. तर बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमध्ये नेमकं काय घडलं?

बीड शहरात घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करत मोहीम हाती घेतली आहे. व्यावसायिक गॅस न वापरता काही हॉटेलमध्ये थेट घरगुती गॅसचा वापर सुरू असल्याची माहिती मिळताच पुरवठा विभागाने शहरात छापेमारी केली. या कारवाईत घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून शहरातील एकूण तीन हॉटेल चालकांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासन आता ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.

हॉटेलवर धडक तपासणी मोहीम राबवली

युद्धजन्य परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यात गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने आज सर्व हॉटेलवर धडक तपासणी मोहीम राबवली. घरगुती वापराचे सिलिंडर हॉटेलसाठी वापरू नयेत, कमर्शियल सिलेंडरचा वापर व्हावा यासाठी थेट किचनमध्ये पथक जाऊन तपासणी केली. सकाळपासून सांगली शहरातील 50 च्या वर हॉटेलवर विशेष मोहीम राबवत कारवाई करण्यात आली.

अकोल्यात LPG गॅस पंप बंद

अकोल्यातही मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. काही पेट्रोल पंपावर एलपीजी गॅसची तात्पुरती टंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल पंप व्यवस्थापनाकडून लावण्यात आलेल्या सूचना फलकावर सध्याच्या परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच गॅसच्या दरांमध्येही काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. सध्या गॅस मिळत नसल्याने LPG गॅस पंप बंद असून पेट्रोल पंप व्यवस्थापनाने ग्राहकांना सद्यपरिस्थिती समजून घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर गॅसचा पुरवठा आणि दर पुन्हा पूर्ववत करण्यात येतील, असेही व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

धुळ्यात मंगल कार्यालयांच्या व्यवसायाला फटका

धुळे शहरातील मंगल कार्यालय लॉन्स आणि केटरर्स व्यवसायिकांनाही युद्धाचा फटका बसला आहे. जिल्ह्यामध्ये 250 लॉन्स आणि मंगल कार्यालये आहेत. या ठिकाणी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लग्न बुक झाले असून या सर्व लग्नकार्य असलेल्या कुटुंबांना जेवण कसं द्यायचं असा प्रश्न लॉन्स मंगल कार्यालय असोसिएशनच्या वतीने विचारला गेला आहे. प्रशासनाच्या वतीने व्यावसायिक सिलिंडर आतापासूनच बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे लग्नकार्यात जेवण कसे बनवायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड