
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष श्री रतन टाटा हे प्राण्यांवर प्रचंड प्रेम करतात, आता ते त्यांच्याच एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.

सध्या त्यांची एक इन्स्टाग्राम पोस्ट चांगलीच शेअर केली गेलीये. महत्वाचं म्हणजे ही पोस्ट 'स्प्राईट' नावाच्या एका कुत्र्यासंतर्भात आहे.

रतन टाटा यांनी स्प्राइटला एक प्रेमळ कुटुंब शोधण्यासाठी मदत मागितली आहे.

' तुम्ही यापूर्वी दोनदा उदारतेनं आणि यशस्वीरित्या मला मदत केली आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी आपणास विनंती करतो की 'स्प्राईट'साठी एक प्रेमळ कुटुंब शोधण्यासाठी मला पुन्हा एकदा मदत करा, स्प्राईट बर्याच गोष्टींमधून गेला आहे. अपघातानंतर तो मागच्या दोन्ही पायांनी अपंग झाला आहे.' असं कॅप्शन देत त्यांनी स्प्राइटचे हे फोटो शेअर केले आहेत.

स्प्राईटला दत्तक घेण्यासाठी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये त्यांनी एक लिंकही दिली आहे. रतन टाटा यांचं स्प्राइटविषयी असलेलं बघून प्रेम अनेक जण भावनिक झाले आहेत.