Repo Rate : होमलोन, कारलोनचा हप्ता कमी होणार का? बैठक झाली, आता फक्त…

आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटबाबत नेमका काय निर्णय घेण्यात आला, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. रेपो रेट कमी झाला तर कर्जाचा हप्ता कमी होऊ शकतो.

| Updated on: Feb 05, 2026 | 9:30 PM
1 / 5
गृहकर्ज, वाहनकर्जाच्या ईएमआयमध्ये गुरफटलेल्या प्रत्येकालाच हा ईएमआय कमी व्हावा, असे वाटते. परंतु तुमचा ईएमआय कमी होणार की वाढणार हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या धोरणावर अवलंबून असते. आता लवकरच पतधोरण समिती आपल्या धोरणाची घोषणा करणार आहे.

2 / 5
6 फेब्रवारी रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची घोषणा करतील. पतधोरण समितीची 2026 सालातील ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीत रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला जाणार का? असे विचारले जात आहे.

3 / 5
गेल्या वर्षी म्हणजेच 2025 साली रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना मोठा दिलास दिला होता. फेब्रुवारी 2025 मध्ये व्याजदरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरात रेपो रेट एकूण 150 बेसीस पॉइंट्स म्हणजेच 1.25 टक्क्यांनी कमी करण्यात आला. डिसेंबर 2025 मध्येह 0.25 टक्के रेपो रेट कमी करण्यात आला होता.

4 / 5
त्यामुळेच आता नव्या वर्षात पहिल्यांदाच आरबीआय पुन्हा एकदा रेपो रेट कमी करणार का? विचारले जात आहे. परंतु तज्ज्ञांच्या मतानुसार यावेळी बँक रेपो रेट कमी करण्याची शक्यता फारच कमी आहे. गेल्या वर्षभरात  1.25 टक्क्यांनी रेपो रेट कमी केल्याने आता पुन्हा एकदा रेपो दरात कपात केली जाण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.

5 / 5
सध्या आर्थिक स्थिती स्थिर राहावी याकडेच आरबीआयचा कल असण्याची शक्यता आहे.  त्यामुळेच या बैठकीत रेपो रेट 5.25 टक्क्यंवरच ठेवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आता प्रत्यक्ष नेमकी काय घोषणा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.