Holi 2026 : रंग लागलेली नोट चालणार की नाही? RBI ने स्पष्टच सांगितलं, नियम काय?

होळीच्या रंगाने नोटा खराब झाल्या आहेत का? रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार अशा नोटा कशा बदलून घ्यायच्या आणि दुकानदार त्या नाकारू शकतात का, याची सविस्तर माहिती येथे वाचा.

| Updated on: Mar 05, 2026 | 1:04 PM
1 / 8
अवघ्या दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात देशभरात होळी साजरी करण्यात आले. मात्र अनेकदा रंग खेळताना आपल्या खिशात असलेल्या नोटांनाही रंग लागतो. कधी कधी त्या ओल्या होतात. मग या अशा नोटा बाजारात चालतील का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

अवघ्या दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात देशभरात होळी साजरी करण्यात आले. मात्र अनेकदा रंग खेळताना आपल्या खिशात असलेल्या नोटांनाही रंग लागतो. कधी कधी त्या ओल्या होतात. मग या अशा नोटा बाजारात चालतील का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

2 / 8

यावर रिझर्व्ह बँकेचे (RBI) नियम नेमके काय आहेत, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. जर होळी खेळताना रंगामुळे नोटा खराब झाल्या असतील तर ती नोट अजिबात अवैध ठरत नाही.

3 / 8

रंगाचा डाग पडल्यामुळे नोटांची कायदेशीर वैधता संपत नाही. अशा नोटा व्यवहारात वापरता येतात. तसेच कोणत्याही दुकानदारांनी त्या स्वीकारण्यास नकार देऊ नये, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण दिले आहे.

4 / 8

जर एखादी नोट रंगाने जास्तच खराब झाली असेल, तर तुम्ही ती कोणत्याही बँकेत जाऊन बदलू शकता. RBI च्या नियमांनुसार, कोणतीही बँक अशा नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय या नोटा बँकेतून बदलून घेऊ शकतात.

5 / 8

पण नोटा बदलताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नोटेचा सीरिअल नंबर (Serial Number) आणि सुरक्षा वैशिष्ट्ये स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. नोटांचे मोठे नुकसान झाले नसेल आणि मजकूर वाचता येत असेल, तर प्रक्रिया सोपी होते.

6 / 8

मुद्दाम खराब केलेल्या किंवा त्यावर काही मजकूर लिहिलेल्या नोटांबाबत बँक अधिक सावधगिरी बाळगते. जर नोटा पाण्याने भिजल्या असतील, तर त्या आधी सुरक्षितपणे वाळवाव्यात.

7 / 8

वाळल्यानंतर नोटेची स्थिती चांगली असेल, तर ती व्यवहारात वापरता येते. मात्र, पाणी आणि रंगांमुळे नोटा अतिशय खराब झाल्या असतील, तर बँकेच्या शाखेत जाऊन त्या बदलून घेणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

8 / 8

त्यामुळे यापुढे रंगाचा डाग लागला म्हणून नोट कचऱ्यात फेकू नका. RBI च्या या नियमांमुळे तुमचे आर्थिक नुकसान टळू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us