
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 16 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना दोन संघामध्ये आहे. मात्र सर्व क्रिकेटप्रेमीचं लक्ष हे 2 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये आतापर्यंत एकमेकांविरोधात जबरदस्त कामगिरी केली आहे.

आयपीएलच्या इतिहासात बंगळुरु आणि राजस्थान आतापर्यंत एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. आकडेवारीनुसार दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. बंगळुरु आणि राजस्थानने प्रत्येकी 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर उर्वरित 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.

या दोन्ही संघांनी भारतात एकूण 18 सामने खेळले आहे. यामध्ये राजस्थान वरचढ ठरली आहे. राजस्थानने 8 मॅच जिंकल्या आहेत. तर बंगळुरुने 7 सामन्यात राजस्थानवर मात केली आहे.

बंगळुरु विरुद्ध राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 220 धावा केल्या आहेत. तर श्रेयस गोपाळने 14 विकेट्स घेतल्या आहेत.

राजस्थान विरुद्ध बंगळुरुकडून 'मिस्टर 360' एबी डी व्हीलियर्सने सर्वाधिक 484 रन्स केल्या आहेत. तर फिरकीपटू युजवेंद्र चहलने 16 विकेट्स मिळवल्या आहेत.

कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जात. सर्वाधिक कॅच घेण्याच्या बाबतीत ही दोन्ही खेळाडू आघाडीवर आहेत. संजू सॅमसन आणि डीव्हीलियर्सने एकमेकांच्या संघाविरोधात जास्त कॅच घेतल्यात. संजूने 7 तर डीव्हीलियर्सने 6 कॅच टिपल्या आहेत.