
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती ही राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्या फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. Centralbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करा. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही मिळेल.

विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उद्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 484 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार हे अर्ज करू शकतात. 18 ते 26 वयाचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

चला तर मग अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल.