Red- Lipped Batfish : लिपस्टिक लावल्यासारखे लाल ओठ, खोल समुद्रात पायांवर चालतो, 99 टक्के लोकांना माहीत नाही हा रहस्यमयी मासा!

समुद्राच्या तळाशी आढळणाऱ्या या माशाचे ओठ अगदी लाल लिपस्टिक लावल्यासारखे दिसतात. Galapagos Islands परिसरातील या विचित्र माशाची वैशिष्ट्ये पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

| Updated on: Oct 06, 2026 | 10:17 PM
1 / 6
समुद्राच्या खोल पाण्यात अनेक मासे आढळतात, ज्यांचा आकार आणि हालचाली पाहून आश्चर्य वाटतं.Red- Lipped Batfish ही त्यापैकीच एक आहे. चमकदार  लाल ओठ आणि समुद्राच्या एकदम तळाशी राहण्यासाठी असलेले वेगळे फिन्स ही या माशाची खास वैशिष्ट्ये आहेत. ही प्रजाती मुख्यत:Galapagos Island या परिसरात आढळते.

समुद्राच्या खोल पाण्यात अनेक मासे आढळतात, ज्यांचा आकार आणि हालचाली पाहून आश्चर्य वाटतं.Red- Lipped Batfish ही त्यापैकीच एक आहे. चमकदार लाल ओठ आणि समुद्राच्या एकदम तळाशी राहण्यासाठी असलेले वेगळे फिन्स ही या माशाची खास वैशिष्ट्ये आहेत. ही प्रजाती मुख्यत:Galapagos Island या परिसरात आढळते.

2 / 6

ओठांवरची लाल लिपस्टिक खास आकर्षण : Red- Lipped Batfish चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचे चमकदार ओठ. हे ओठ इतके वेगळे दिसतात की माश्याने लिपस्टिक लावल्याचा भास होतो. हा वेगळा पण खास दिसणारा मासा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे.

3 / 6

हा मासा फक्त समुद्राच्या तळाशी राहतो :इतर माशांप्रमाणे सतत पोहण्याऐवजी हा मासा पाण्यात चालतो. पेक्टोरल आणि पेल्किक फिन्सचा वापर करून पुढे सरकतो. त्यामुळे हा मासा पाण्यात चालतोय असे दिसते.

4 / 6

ही प्रजाती कुठे आढळते : ही प्रजाती Galapagos Island या परिसरातील पूर्व प्रशांत महासागरात आढळते. ती त्या भागातील स्थानिक Endemic Species आहे. समुद्राच्या वालुकामय किंवा खडकाळ तळाशी हा मासा आढळतो.तसेच हा मासा 70 मीटरपेक्षा जास्त खोलीत आढळू शकते.

5 / 6

ओठ लाल पण शरीर काळ : हा माश्याचे ओठ जरी लाल असले तरी या माश्याची त्वचा तपकिरी किंवा राखाडी रंगाची आहे. तर पोटाचा भाग पांढरा आहे. दिसण्यास हा मासा खूप विचित्र असा आहे.

6 / 6

डोक्यावर असतो नैसर्गिक फिशिंग रॉड :Red- Lipped Batfish ही Anglerfish समूहाशी संबंधित आहे. त्याच्या डोक्यावर illucium नावाची एक रचना आहे. त्याचा उपयोग छोट्या समुद्री जीवांना आकर्षित करण्यासाठी केला जातो.त्यामुळे जास्त न पोहता ती शिकार करू शकते. हा मासा आकाराने साधारण 20 ते 25 मीटर इतकाच असतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us