
आपल्या अभिनयानं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री रेखा यांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये दिसून येते.

वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. चाहत्यांना देखील रेखा यांचा प्रत्येक लूक आवडतो. आता देखील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पांढऱ्या रंगाच्या साडीत रेखा यांनी खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेखा यांच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत आहेत.

'रेखा यांचं वय वाढत नाही तर, कमी होतंय...', अशी कमेंट एका चाहत्याने केली. तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'रेखा म्हणजे एव्हरग्रीन सौंदर्य...'

एक काळ असा होता जेव्हा रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही त्यांचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात.