27 दिवस भोगला तुरुंगवास, सिनेविश्वात काम मिळेना, पण अभिनेत्रीने जगतेय आलिशान आयुष्य, संपत्ती थक्क करणारी
बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री जिने बॉयफ्रेंडच्या निधनानंतर तब्बल 27 दिवसांचा तुरुंगवास भोगला. त्यानंतर अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. तुरुंगातून आल्यामुळे तिच्याकडे कोणतंच काम नव्हतं... पण आता अभिनेत्री आलिशान आयुष्य जगत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या रॉयल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रिया चक्रवर्ती आहे. रिया आता कोट्यवधी रुपयांची मालक असून आलिशान जीवन जगते. मुंबईत तिचं लाखो रुपयांचं घर आणि अनेक गाड्या आहेत. रिया चक्रवर्तीने तिच्या करिअरची सुरुवात टीव्हीवरून केली. तिला फार कमी लोक ओळखत होते. पण सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर तिचं नाव प्रकाशझोतात आलं आणि तिच्या आयुष्यात उलथापालथ झाली.

रिया चक्रवर्तीने तिच्या कारकिर्दीत खूप संघर्ष केला आहे. तिला एका मोठ्या बॅनरच्या सिनेमात नकार मिळाला होता. सध्या, अभिनेत्री रिया चक्रवर्ती बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खूप सक्रिय नसली तरी, ती 'फॅमिली बिझनेस' या सीरिजद्वारे अभिनयात पुनरागमन करणार आहे. ही सीरिज लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

रिया चक्रवर्तीने टीव्ही, बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं आहे. आज रिया चक्रवर्तीचा वाढदिवस आहे. त्यामुळे तिच्या आयुष्याबद्दल आणि तिच्या एकूण संपत्तीबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

रिया चक्रवर्तीने आपल्या करिअरला सुरुवात करून सुमारे 17 वर्षे झाली आहेत. या काळात तिच्या आयुष्यात अनेक वाद निर्माण झाले. याचा तिच्या प्रोफेशनल जीवनावर परिणाम झाला आहे. अहवालानुसार, रिया चक्रवर्तीची एकूण संपत्ती अंदाजे 11 कोटी ते 14 कोटी रुपये आहे.

रिया चक्रवर्ती दरमहा सुमारे 2.5 लाख रुपये कमावते आणि तिची एकूण संपत्ती अंदाजे 14 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. तिची कमाई सिनेमांपेक्षा ब्रँड एंडोर्समेंट आणि स्टेज शोमधून जास्त होते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.