
'बिग बॉस' म्हटलं की नॉमिनेशनही आलं. ट्रॉफी जिंकण्यासाठी सदस्य एकमेकांचे पाय खेचताना दिसून येतात. त्यासाठी ते एकमेकांना नॉमिनेटदेखील करतात.

या आठवड्यात अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, वैभव चव्हाण आणि आर्या हे सदस्य नॉमिनेट झाले होते. यात आर्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढलंय.

त्यामुळे आता अभिजीत, वर्षा, निक्की, अंकिता आणि वैभव यांच्यापैकी कोणाला घरचा आहेर मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख घरात असून तो बाहेर पडणाऱ्या सदस्याबद्दल बोलताना दिसत आहे. रितेश म्हणतोय, "आज घरातून कोण बाहेर जाणार हे मला जाहीर करायचं आहे. तुमच्यासमोर येऊन हे करणं माझ्यासाठी प्रचंड अवघड आहे. देशातील मराठी प्रेक्षकांनी ठरवलंय या आठवड्यात घराबाहेर जाणारा सदस्य आहे...".

यंदा रितेश भाऊच्या धक्क्यावर बाहेर पडणाऱ्या सदस्याचं नाव न जाहीर करता घरात येऊन सदस्यांसमोरच नाव जाहीर करणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या या भागात एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.