
राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थती निर्माण झाली आहे. मागील तीन -चार दिवसांपासून मुंबई पुण्यातहीस सातत्याने पाऊस कोसळत असल्याने रस्ते जलमय झाले आहेत.

पुण्यातील खडावासाला धरणातून दुपारी एक वाजता 11 हजार 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातून हे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे.

धरणातून पाणी सोडल्यामुळे शहरातील भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भिडेपुलाला लागून पाणी आल्यामुळे ही वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबईतही संतधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतिल अनेक भागात पाणी घुसल्याने रस्ते परिसर जलमय झाल्याचे दिसून आले आहे.

ठिकठिकाणी पाणी साठल्याने नागरिकांना मोठ्या अडथळ्यांचा सामना करत आपली दैनंदिन कामे पार पाडावी लागत आहेत. अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्याने पाणी साठून राहिले आहे.
