AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धबधब्याखाली पारदर्शक साडीत दिला पहिलाच सीन, पाहून या अभिनेत्रीची मंदाकिनीसोबत झाली तुलना, आजही होतो पश्चाताप

बॉलिवूडमधील या अभिनेत्रीने पदार्पण करणाऱ्या चित्रपटात दिला असा सीन की तिची मंदाकिनीसोबत होऊ लागली तुलना. अभिनेत्रीला आजही होता त्याचा पश्चाताप. कोण आहे ती अभिनेत्री?

धबधब्याखाली पारदर्शक साडीत दिला पहिलाच सीन, पाहून या अभिनेत्रीची मंदाकिनीसोबत झाली तुलना, आजही होतो पश्चाताप
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 11, 2026 | 3:33 PM
Share

अनेक लोक मोठ्या पडद्यावर झळकण्याचे स्वप्न घेऊन दरवर्षी मायानगरी मुंबईत येतात. त्यापैकी काहीजणच हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करू शकतात. एखाद्या कलाकारासाठी पहिला चित्रपट मिळणे ही केवळ सुरुवात नसून करिअर घडवण्याची मोठी संधी असते. मात्र, अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांच्या बाबतीत थोडे वेगळे घडले. पहिल्याच चित्रपटानंतर त्यांना पश्चात्ताप झाला होता.

1990 ‘किशन कन्हैया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे 9 मार्चला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता 36 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातून शिल्पा शिरोडकर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटात त्यांनी ‘राधा’ या साध्या गावातील मुलीची भूमिका साकारली होती. पहिलाच चित्रपट असूनही ‘किशन कन्हैया’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि 1990 सालातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी चौथ्या क्रमांकावर होता. तरीही या चित्रपटातील एका सीनमुळे शिल्पा शिरोडकर यांना नकारात्मक प्रतिक्रिया सहन कराव्या लागल्या.

एका गाण्यामुळे झाली टीका

चित्रपटातील ‘ राधा बिना है किशन अकेला’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. या गाण्याचे संगीत आणि बोल दोन्ही प्रेक्षकांना आवडले. मात्र या गाण्यातील एका सीनमध्ये शिल्पा शिरोडकर यांना धबधब्याखाली पांढरी पारदर्शक साडी घालून दाखवण्यात आले होते. या सीनची तुलना ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील मंदाकिनी यांच्या प्रसिद्ध सीनशी केली जाऊ लागली.

यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच शिल्पा शिरोडकर यांच्यावर टीका झाली आणि त्यांची तुलना मंदाकिनीशी केली जाऊ लागली. नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःही सांगितले होते की हा चित्रपट साइन केल्याबद्दल त्यांना काही काळ पश्चात्ताप झाला होता.

चित्रपटाबद्दल थोडक्यात

किशन कन्हैया हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता. या अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपटात अनिल कपूरने दुहेरी भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री माधुरी दीक्षितने चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

विशेष म्हणजे या चित्रपटासाठी सुरुवातीला अमिताभ बच्चन यांना भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र त्या काळातील व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांनी चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतर या भूमिकेसाठी अनिल कपूर यांची निवड करण्यात आली.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा