
आमदार रोहित पवार नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतात.

आता त्यांचा मैदानातील खेळ चर्चेचा विषय बनला आहे.

रोहित पवार हे बीड दौऱ्यावर असताना नियोजित वेळेआधीच पोहोचल्यानं मैदानावर जाऊन थोडा वेळ क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे खेळ खेळले.

या दरम्यानचे काही फोटो त्यांनी स्वत: ट्विट करत शेअर केले आहेत.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार संदिप जी क्षीरसागर, जयसिंग भैय्या सोळंके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.